Ahan Shetty Viral Video : सनी देओल स्टारर बॉर्डर 2 चित्रपटाचा ट्रेलर आणि घर कब आओगे गाणं लॉन्च झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट येत्या 23 जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर' चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात सनी देओलसोबत वरुण धवन,अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचं ‘घर कब आओगे' हे गाणे शुक्रवारी रिलीज झाले आहे. या गाण्याच्या लॉन्चिंगसाठी राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एक भव्य इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. या इव्हेंटला चित्रपटाचे संपूर्ण स्टार कास्ट उपस्थित होते. अशातच या इव्हेंटचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडीओत भारतीय सैनिक अहान शेट्टीला कारपर्यंत पकडून नेताना दिसत आहेत.
अहान शेट्टीचा व्हिडिओ होतोय व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे,ज्यात सैनिक अहान शेट्टीला पकडून कारपर्यंत नेत आहेत. त्यांनी अहानचा हात आणि खांदा घट्ट पकडलेला आहे.शेवटी अहान हात सोडवून कारमध्ये बसतो,हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.व्हिडीओ पाहिल्यावर काही लोकांनी कमेंटमध्ये म्हटलंय की, अहानची तब्येत बिघडली होती म्हणून त्याला अशा प्रकारे नेण्यात आले.तर काहीजण म्हणत आहेत की, गर्दी आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. अहान इव्हेंट दरम्यान रागावला होता, असंही काहींनी म्हटलं आहे. पण यामागचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. सोशल मीडियावर या व्हिडीओबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.
नक्की वाचा >> कंडोम फॅक्ट्री अन् 150 बॉडीगार्ड..Bigg Boss 19 ची फेमस अभिनेत्री हात जोडून म्हणाली, "कोणतीही क्लिप.."
या इव्हेंटसाठी शुक्रवारी सकाळी अहान शेट्टी, वरुण धवन आणि निधी दत्ता रवाना झाले होते.या इव्हेंटला सनी देओलही उपस्थित होते. गाणं लॉन्चिंग इव्हेंट सुरु झाल्यावर अहान शेट्टीनं सनी देओलच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. अहानचा हा अंदाज पाहून अनेकांनी त्यांचं कौतुकही केलं आहे. तसच सनी देओल या इव्हेंटमध्ये धर्मेंद्र यांच्या आठवणीत भावुक झाल्याचंही पाहायला मिळालं. माध्यमांशी संवाद साधून सनी देओलने म्हटलं, “सध्या मी जास्त बोलू शकत नाही. मी बोलण्याच्या मनस्थितीत नाही."
नक्की वाचा >> OTT Web Series 2026 : 'पंचायत 5', 'हीरामंडी 2' ते 'मटका किंग', 2026 मध्ये येतायत झोप उडवणाऱ्या 'या' 8 वेबसीरिज
‘बॉर्डर 2' मध्ये झळकणार अहान शेट्टी
‘बॉर्डर 2' मध्ये अहान शेट्टी पियुष अल्प्रेड नोरोन्हा यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकतेच त्याने ‘बॉर्डर 2' च्या सेटवरून एक फोटो शेअर केला होता, ज्यात अहान वडील सुनील शेट्टीसोबत दिसत आहेत.सुनील शेट्टीनेही याआधीच्या बॉर्डर चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world