रेखा यांच्या मांडीवर बसलेल्या या अभिनेत्याने बॉलीवूड गाजवलं होतं, आमीर-शाहरूखपेक्षा तरुणींना आवडायचा हा अभिनेता

दिसायला अत्यंत देखणा असलेल्या निळ्याशार डोळ्यांच्या या अभिनेत्यांने तरुणींना वेड लावलं होतं.

Advertisement
Read Time2 min
रेखा यांच्या मांडीवर बसलेल्या या अभिनेत्याने बॉलीवूड गाजवलं होतं, आमीर-शाहरूखपेक्षा तरुणींना आवडायचा हा अभिनेता
मुंबई:

अमिताभ बच्चन, शाहरूख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'मोहब्बतें' हा मल्टीस्टारर चित्रपट तगडी कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील लक्षात राहणारा चेहरा होता तो म्हणजे जुगल हंसराज,

दिसायला अत्यंत देखणा असलेल्या निळ्याशार डोळ्यांच्या या अभिनेत्यांने तरुणींना वेड लावलं होतं.

जुगलला पुढे फार चांगले चित्रपट मिळाले नाही आणि हळूहळू तो बॉलीवूडमधून गायब झाला. मात्र आजही त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री रेखा यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये रेखा यांच्या मांडीवर एक मुलगा बसलेला दिसतो आहे. हा मुलगा जुगल हंसराज असून या फोटोमुळे जुगल हंसराज पुन्हा एकदा अनेकांना आठवला आहे. 

जुगल हंसराज याने बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पाय ठेवलं होतं. 'झूठा सच' नावाच्या चित्रपटात जुगल हंसराज हा बालकलाकार म्हणून होता. या चित्रपटात रेखा या प्रमुख भूमिकेत होत्या. जुगलने बॉलीवूडला राम राम ठोकला असून तो आपल्या कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाला आहे. जुगलचे जास्मिन धिल्लों यांच्याशी लग्न झाले असून जास्मिन ही बँकींग आणि गुंतवणूक क्षेत्रात काम करते.  जुगल चित्रपटष्टीत सक्रिय नसला तरी तो सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. जुगलचा लूकही पूर्वीच्या तुलनेत खूप बदलला आहे.

एक काळ असा होता की शाहरुख खानपेक्षा मुली जुगलकडे जास्त आकर्षित होत होत्या. जुगल हंसराजने बालकलाकार म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. मासूम आणि कर्मा यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केले असून. पापा कहते, मोहब्बतें, सलाम नमस्ते आणि आजा नचले, हे जुगल हंसराजचे काही लोकप्रिय चित्रपट आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: