जाहिरात

पार्टीत येण्याचे 25,00000 तर रीलसाठी 76,00000 रुपये आकारतो हा ओरी; सांगितले कमाईचे मोठे स्त्रोत

सोशल मीडियाचा वापर करणारे ओरीला नक्की ओळखत असतील. बॉलिवूड स्टार्स सोबतचे त्याचे फोटो, पार्ट्यांमध्ये उपस्थिती आणि त्यातच त्याचा वेगळा अंदाज नेहमीच चर्चेत असतो.

पार्टीत येण्याचे 25,00000 तर रीलसाठी 76,00000 रुपये आकारतो हा ओरी; सांगितले कमाईचे मोठे स्त्रोत
NDTV

सोशल मीडियाचा वापर करणारे ओरीला नक्की ओळखत असतील. बॉलिवूड स्टार्स सोबतचे त्याचे फोटो, पार्ट्यांमध्ये उपस्थिती आणि त्यातच त्याचा वेगळा अंदाज नेहमीच चर्चेत असतो. मात्र ओरी काय करतो, त्याची कमाई कुठून होते असा प्रश्न अनेकांना पडतो. आता स्वत: ओरीने आपली कमाई आणि बिझनेस मॉडलबद्दल मोकळेपणाने चर्चा केली आहे. त्याचे खुलासे ऐकून सोशल मीडियावरील लोकही हैराण झाले आहेत. 

पॉडकास्टमध्ये काय केला खुलासा? 

नुकतीच ओरी Kavya Karnatac च्या पॉडकास्टमध्ये दिसली. येथे तो त्याचं प्रोफेशनल लाइफ आणि कमाईबद्दल बोलला. त्याने सांगितलं की, त्याने सोशल मीडियावरुन त्याची ओळख आणि लोकप्रियता एका बिझनेसमध्ये बदलली.

एका डीलमधून ७६ लाखांची कमाई...

आपल्या कमाईबद्दल बोलताना तो म्हणाला, त्याच्या उत्पन्नाता मोठा भाग ब्रँड कोलॅबरेशन आणि पेड अपियरन्स मधून येतो. त्याने दावा केला आहे की, गेल्या महिन्यात त्याने एका रीलमधून ७६ लाख कमावले. त्याचं हे वक्तव्य ऐकून अनेकजण हैराण झाले. 

लग्न, वाढदिवस आणि डिनरमध्ये सामील होण्यासाठी घेतो पैसे...

ओरीने सांगितलं की, त्याचं काम केवळ सोशल मीडिया पोस्टपुरतं अवलंबून नाही. त्याने सांगितलं की, लोक त्याला वैयक्तिक कार्यक्रमासाठीही बोलावतात आणि त्याचे पैसे देतात. लग्न, वाढदिवस, डिनर किंवा इतर खास कार्यक्रमात सामील होण्यासाठी तो १५ लाख ते २५ लाखांपर्यंत पैसे घेतो. तो हसत हसत म्हणाला, लोक त्याला लंच, डिनर किंवा लग्नात सामील होण्यासाठी बुक करू शकतात. कार्यक्रमात गेल्यानंतर तो पाहुण्यांना भेटतो. फोटो काढतो. गप्पा मारतो. 

ओरीचं म्हणणं आहे की, आजच्या काळात एखाद्याचं लक्ष खेचून घेणं आणि लोकांमध्ये ओळख निर्माण करणं एक मोठा बिझनेस झाला आहे. आता केवळ प्रॉडक्टचं नाही तर एखाद्याची लोकांमधील छवी आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धी महत्त्वाची ठरते. यामुळेच त्याची ओळख आणि लोकप्रियता त्याच्यासाठी कमाईचं एक माध्यम बनलं आहे. 

आपल्या सिग्नेचर पोजविषयी म्हणाला...

मुलाखतीदरम्यान ओरीने आपल्या प्रसिद्ध सिग्नेचर पोजचा उल्लेख केला. तो मस्करीत म्हणाला, भारतात केवळ दोन पोज सर्वात प्रसिद्ध आहे, एक शाहरुख खान आणि दुसरा तो ओरीचा. त्याचं हे वक्तव्य सोशल मीडियावर खूप चर्चेत होतं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com