जाहिरात

Chhaava Box Office Collection Day 2 : 'छावा' पाहण्यासाठी प्रेक्षकांची थिएटरमध्ये गर्दी; दुसऱ्या दिवशीही रेकॉर्डब्रेक कमाई

Chhaava box office collection day 2: बॉक्स ऑफिस ट्रॅकर सकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, छावा चित्रपटाने पहिल्या दिवशी 31 कोटींची कमाई केली.

Chhaava Box Office Collection Day 2 : 'छावा' पाहण्यासाठी प्रेक्षकांची थिएटरमध्ये गर्दी; दुसऱ्या दिवशीही रेकॉर्डब्रेक कमाई
Chhaava box office collection day 2 छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन डे 2

Chhaava box office collection day 2 : छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना छावा सिनेमाच्या माध्यमातून मिळत आहे. यामुळेच छावा चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणलं आहे. पहिल्या दिवशीच्या भरघोस प्रतिसादानंतर दुसऱ्या दिवशीही प्रेक्षकांची थिएटरमध्ये गर्दी पाहायला मिळाली. छावा चित्रपटाने पहिल्या काळात अनेक मोठे रेकॉर्ड मोडले. 'छावा' हा 2025 सालचा आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग करणारा हिंदी चित्रपट ठरला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बॉक्स ऑफिस ट्रॅकर सकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, छावा चित्रपटाने पहिल्या दिवशी 31 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी हा आकडा 36.5 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे दोन दिवसांत चित्रपटाची कमाई 67.5 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने जगभरात 50 कोटी रुपये कमावले असल्याने, जगभरातील कमाई दोन दिवसांत 100 कोटी रुपयांच्या पुढे जाईल असे म्हटले जाते. 

(नक्की वाचा- 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना! पहिल्याच दिवशी पैशांचा पाऊस; कमाईचा आकडा किती?)

छावामध्ये सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. स्मृती मंदाना संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत दिसली. तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात डायना पेंटी, आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंग यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 

(नक्की वाचा- Amravati News: 'भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण..', कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना हिणवलं)

2025 मध्ये आतापर्यंत अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. परंतु त्यापैकी कोणत्याही चित्रपटाची सुरुवात इतकी चांगली झाली नाही. 'छावा' चित्रपटाला प्रेक्षकांकडून तसेच चित्रपट समीक्षकांकडून खूप कौतुक मिळत आहे. 'छावा' हा चित्रपट 130 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला आहे. त्या अर्थाने 'छावा' चित्रपटाने रिलीजच्या दोन दिवसातच 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.