
Chhaava movie news : संभाजी महाराजांवर आधारित असलेला आणि विक्की कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांनी भूमिका साकारलेला छावा या चित्रपट 14 फेब्रुवारीला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. त्याच्या 22 दिवसातच चित्रपटाने जबरदस्त कामगिरी केली आहे. शिवाजी सावंत यांची प्रसिद्ध कादंबरी 'छावा'यावर आधारित चित्रपटाने 500 कोटींची टप्पा पार केला आहे. 7 मार्च रोजी छावा चित्रपट तेलुगुमध्ये प्रदर्शित झाला आहे. ज्याच्या पहिल्याच दिवशी शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट पठाणचा रेकॉर्ड मोडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं आहे. विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारत महाराजांचा पराक्रम पडद्यावर आणला आहे. छावा चित्रपटामुळे संभाजी महारांचा पराक्रम, त्याग पुन्हा एकदा जिवंत पाहायला मिळत आहे. प्रदर्शित झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसवर केवळ 'छावा'चंच राज्य आहे. 'छावा' प्रदर्शित होऊन आता 22 दिवस झाले आहेत. या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 22 दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा टप्पा पार केला आहे.
नक्की वाचा - Chal halla Bol: सेन्सॉर बोर्डाचा उर्मटपणा! नामदेव ढसाळांच्या कुटुंबियांचा अपमान; तुम्ही दलित...
1000चा टप्पा गाठणार का?
छावा चित्रपटात विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. संपूर्ण देशभरात 22 दिवसांत 'छावा'ने 502.7 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने पहिल्या आठवडयात 225.28 कोर्टीचा गल्ला जमवला होता. दुसऱ्या आठवड्यात 186.18 कोटींची कमाई केली. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 84.14 कोटी कमावले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world