Chhaava Review : 'शेर नही रहा, लेकीन छावा अभी भी जंगल मै घुम रहा है" या डायलॉगने सुरु झालेल्या छावा चित्रपटाच्या ट्रेलरने अंगावर काटा आणला होता. चित्रपटाचा टीझर आणि त्यानंतर आलेल्या ट्रेलरनंतर अख्ख्या महाराष्ट्रासह देशाला सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा होती. ट्रेलरमध्ये विकी कौशल आणि अक्षय खन्नाचे डायलॉग आणि अॅक्टिंगने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. सिनेमाची कथा कशी असेल, त्याची मांडणी कशी असले, डायलॉग कसे असतील? याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे चित्रपट नेमका कसा आहे यावर एक नजर टाकुया.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर याने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास रुपेरी पडद्यावर उतरवण्याचं शिवधनुष्य हाती घेतलं होतं. छत्रपती संभाजी महाराज जगाला कळावे हा प्रामाणिक हेतू दिग्दर्शकाचा होता. मात्र सिनेमा रिलीज झाल्यानंतर असं दिसतंय की विकी कौशल, रश्मिका मंदानासह अनेक कलाकार ऐतिहासिक कलाकृती सादर करताना अभिनयात काहीसे कमी पडले. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल आणि महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत रश्मिका मंदाना दिसत आहे. तर औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहे.
(नक्की वाचा- Sai Tamhankar : सईच्या 'निर्लज्ज कांदे पोहे' कार्यक्रमाला IGL चा फटका; काय आहे कारण?)
अजय देवगणच्या आवाजात सुरुवात
अजय देवगनच्या भारदस्त आवाजात सिनेमाची सुरुवात होते. सिनेमाच्या पहिल्याच सीनमध्ये औरंगजेब म्हणजेच अक्षय खन्नाची एण्ट्री होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनाची वार्ता ऐकून औरंगजेब खूश होतो. औरंगजेबाला वाटतं की मराठा साम्राज्य आता संपलं आणि त्यावर कब्जा करणं सोपं होईल. मात्र औरंगजेबाच्या स्वप्नांचा क्षणात चुराडा करत छत्रपती संभाजी महाराज बुरहानपूर आक्रमण करत मुघलांच्या सैन्याला धुळ चारतात. ट्रेलरमध्ये हाच सीन दाखवण्यात आला होता. संभाजी महाराजांच्या या आक्रमणानंतर औरंगजेबाचा तिळपापड होतो आणि तो संतापून मराठा साम्राज्य नष्ट करण्याची शपथ घेतो. सिनेमाच्या सुरुवातीलाचा हा मोठा सीन आहे.
ढेपाळलेले डायलॉग
सिनेमा जसा पुढे सरकतो, तसं सिनेमावरची पकड काहीशी सुटताना दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट म्हणून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा त्याकडून होत्या. मात्र सिनेमातील डायलॉग कुठेतरी मार खाताना दिसले. महाराजांचा इतिहास उभा करताना प्रत्येक डायलॉगवर टाळ्या पडतील, अशी अपेक्षा होती. मात्र विकी कौशलचा आवाज आणि डायलॉग डिलिव्हरी यामुळे प्रेक्षकांमध्ये तो जोश निर्माण झाला नाही.
( नक्की वाचा : India's Got Latent: असभ्यतेचे सर्व रेकॉर्ड तोडणारी Apoorva Mukhija कोण आहे? ती चर्चेत का आहे? )
विकी कौशलचा अभिनय प्रभावी वाटला नाही
विकी कौशलला छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मात्र तो संपूर्ण चित्रपटात ओरडाओरडा करताना दिसला. एखाद्या दाक्षिणात्य सिमेमातील अभिनयाप्रमाणे त्याचा अभिनय दिसला. छत्रपती संभाजी महाराज समजून घेण्यात विकी कौशल काहीसा कमी पडलाय.
अक्षय खन्नाने आपल्या व्यक्तिरेखेला न्याय दिला. आपल्या अभियातील ताकद त्यांने पुन्हा एकदा दाखवून दिली. चित्रपटात त्याचे संवाद कमी असले तरी, जेव्हा तो बोलतो तेव्हा तो खूप संयमीपणे बोलतो. त्याच्या संयमी आणि शांतपणातून औरंगाजेबाची दहशत झळकते.
(नक्की वाचा- 'या' 2 चुकांमुळे तुटलं समांथाचं घर? व्हॅलेटाईंन डे पूर्वी अभिनेत्रीची पोस्ट Viral)
रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंच्या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र रश्मिकाच्या डायलॉगमध्ये कुठेतरी साऊथ टच दिसून येतो. डायना पेंटीने औरंगजेबाची मुलगी झीनत-उन-निसा बेगमची भूमिका साकारली. मात्र जबरदस्तीने ती ही भूमिका साकारतेय असं जाणवत होतं. सिनेमाची मांडणी करताना काही गोष्टींमुळे चित्रपटाची कथा देखील अर्धवट वाटते. काही सीन देखील एकमेकांशी जुळताना दिसत नाही. अनेक अॅक्शन सीन हॉलिवूड चित्रपटांतील सीनप्रमाणे वाटतात. बॅकग्राऊंड म्युझिक देखील प्रभाव पाडताना दिसत नाही. त्यामुळे अपेक्षांचं ओझं घेऊन जाणाऱ्या प्रेक्षकांची काहीशी निराशा सिनेमा पाहिल्यानंतर होऊ शकते.