
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शिक 'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर राज्यभरात बऱ्याच ठिकाणी वाद उफाळल्याचं पाहायला मिळालं. या चित्रपटाचा आधार देत दोन समाजामध्ये दुफळी निर्माण करणाऱ्या प्रयत्न काही संघटनांकडून करण्यात आला. महायुतीच्या अनेक नेत्यांकडून चित्रपटाचं समर्थन केलं तर अनेकांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. धक्कादायक म्हणजे या चित्रपटात भूमिका साकारलेला अभिनेता आस्ताद काळे याने चित्रपटाबद्दल आपली भूमिका मांडली होती. छावा वाईट चित्रपट आहे. हा चित्रपट खूप वरवर दाखविण्यात आला आहे. खोलात जाऊन चित्रपट करण्यात आला नाही असं काळे म्हणाला होता. आता भाजप नेत्याने छावा चित्रपटाबद्दल वक्तव्य केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजप नेते शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, चित्रपटामुळे इतिहास समजायला लागला याचं मला दुःख वाटतं. छावा चित्रपटामुळे इतिहास समजला हे आपलं दुर्दैव आहे. आपल्या पिढीला चित्रपटातून इतिहास कळतोय. छत्रपती महाराजांचे अनेक किस्से आहेत. जे आताच्या पिढीला माहीत नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. ते सांगलीमध्ये विसावा मंडळ, सांगली यांच्या वतीने शिवोत्सव आणि हिंदू संघटनेच्या व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते.
नक्की वाचा - PM Narendra Modi : पहलगाम हल्ल्यापूर्वी पंतप्रधान मोदी होते दहशतवाद्यांच्या टार्गेटवर? खळबळजनक माहिती समोर
आज या महाराष्ट्राची धुरा एक जाणता नेता देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. महाराष्ट्राला काय हवं हे या नेत्याला चांगलं कळतं. आणि आतापर्यंत झालेले नेते आपापल्या विभागापुरते मर्यादित होते, असंही ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपतींसारखे शासन स्वराज्याची निर्मिती झाली पाहिजे. हे कार्य आपल्यालाच करायचं आहे. मोबाइलच्या माध्यमातून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातं. कोणाचीही बदनामी केली जाते. हे रोखायला हवं. यासाठी आपण अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world