जाहिरात

Devendra Fadnavis Raj Thackeray Meeting: CM फडणवीस आणि राज ठाकरे पुन्हा येणार एकत्र; कुठे-कधी-केव्हा आणि का?

Devendra Fadnavis Raj Thackeray Meeting: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे 11 ऑक्टोबर रोजी एकाच मंचावर एकत्र दिसणार आहेत.

Devendra Fadnavis Raj Thackeray Meeting: CM फडणवीस आणि राज ठाकरे पुन्हा येणार एकत्र; कुठे-कधी-केव्हा आणि का?
"Devendra Fadnavis Raj Thackeray Meeting: CM फडणवीस आणि राज ठाकरे पुन्हा दिसणार एकत्र"
IANS

CM Devendra Fadnavis and MNS Chief Raj Thackeray: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वर्षभरात जवळपास तीन वेळा भेटीगाठी झाल्या असतील. आता लवकरच पुन्हा एकदा राज्यातील जनतेला मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र दिसणार आहेत. दोघांच्या होणाऱ्या या भेटीमध्ये नेमके कोणत्या विषयावर चर्चा होणार आहे? ही भेट राजकीय असणार आहे का? की नागरी समस्यांवर चर्चा होईल? या भेटीमुळे राजकीय समीकरण बदलणार आहे का? अशा अनेक प्रश्नांनी लोकांना भंडावून सोडलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट कधी, केव्हा, कुठे आणि का होणार आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेटीमागील कारण

तर CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत एका कार्यक्रमानिमित्त 11 ऑक्टोबर 2025 रोजी भेटणार आहेत. एकाच व्यासपीठावर हे दोन दिग्गज दिसणार आहेत. 

CM देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे कोणत्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शवणार?

महेश वामन मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 11 ऑक्टोबर 2025 रोजी सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमासाठी CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख उपस्थिती दर्शवणार आहेत. शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता लोअर परळ येथील फिनिक्स पलेडिअम येथे सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात येणार आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसणार आहेत. तर आगामी सिनेमाच्या ट्रेलर लाँचनिमित्ताने हे दोघं एकत्र येणार आहेत.  

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा कधी होणार रिलीज?

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा सिनेमा 31 ऑक्टोबर रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी सिनेमाचा दमदार टीझर लाँच करण्यात आला. आजवर कधीच दिसले नाही, असे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रखर रूप या सिनेमामध्ये दिसणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सिनेमामध्ये मराठी भाषेची अस्मिता, बळीराजाच्या आत्महत्येचा मुद्दा, मराठी माणसांचे मुंबईतील स्थान, परप्रांतीयांची मुजोरी असे विविध विषय सिनेमामध्ये दिसणार आहेत. 

'सोसाइटी में हम घाटी लोगों को नहीं रखते...मराठ्यांचा दणका दाखवला का कधी', पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाचा दमदार टीझर

(नक्की वाचा: 'सोसाइटी में हम घाटी लोगों को नहीं रखते...मराठ्यांचा दणका दाखवला का कधी', पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाचा दमदार टीझर)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Punha Shivaji Raje Bhosale Movie

(नक्की वाचा: Entertainment News: जटा, शरीरावर भस्म, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा... बड्या दिग्दर्शकाची का झाली अशी अवस्था?)

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार आहे?

अभिनेता सिद्धार्थ बोडके सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. यासह सिनेमामध्ये विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री अशी कलाकारांची तगडी फौजही दिसणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्याही सिनेमामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत.    

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com