जाहिरात

Bharti singh income: कॉमेडियन भारती सिंहची कमाई किती? TV अन् युट्यूब कडून मिळतात 'इतके' पैसे

भारतीने हेही सांगितलं की तिने यूट्यूब चॅनेल सुरू करण्याचा निर्णय का घेतला.

Bharti singh income: कॉमेडियन भारती सिंहची कमाई किती? TV अन् युट्यूब कडून मिळतात 'इतके' पैसे

प्रसिद्ध कॉमेडियन आणि होस्ट भारती सिंगने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये तिच्या कमाईबद्दल माहिती दिली आहे. तिने सांगितलं की तिला टीव्ही आणि यूट्यूबमधून किती पैसे मिळतात. या दोन्ही माध्यमांमधून तिला सर्वाधिक फायदा कशातून होतो हे ही तिने स्पष्ट केले आहे. दोन वर्षांपूर्वी तिने स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरू केले होते. आज ती त्यातून खूप पैसे कमवत आहे असं तिनेच सांगितलं आहे. शिवाय तिच्याकडे काही मालिका ही आहेत. त्यातूनही तिला पैसे मिळत असतात. ते किती पैसे मिळतात हे तिने पहिल्यांदाच सर्वां समोर सांगितले आहे. 

भारती सिंगचा प्रवास खूपच संघर्षमय होता. ती फक्त दोन वर्षांची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं. तिच्या आईने एकटीने तिला आणि तिच्या भावंडांना वाढवलं. भारती अनेकदा सांगते की तिच्या कुटुंबाने खूप गरिबी पाहिली आहे. कधी-कधी त्यांना जेवायलाही काही नसायचं. त्यांची आई लोकांच्या घरी काम करून कुटुंबाला सांभाळायची. पण आज भारती तिच्या मेहनतीच्या आणि टॅलेंटच्या बळावर यशस्वी झाली आहे. तिने स्वतःचंच आयुष्य नाही, तर तिच्या कुटुंबाचं आयुष्यही बदललं आहे. आज ती भारतातील सर्वात यशस्वी महिला कॉमेडियन आणि होस्टपैकी एक आहे. ती सध्या खूप आलिशान जीवन जगत आहे.

नक्की वाचा - 8 दिवसांचे शूटिंग, 49 लाख बजेट, 20,000 कोटींची कमाई! 'या' चित्रपटाने इतिहास घडवला, पण...

एका पॉडकास्टमध्ये भारतीला विचारलं गेलं की जर ती 100 रुपये कमावते, तर त्यापैकी किती टीव्हीमधून आणि किती यूट्यूबमधून येतात? त्यावर तिने उत्तर दिलं, "माझ्या एकूण कमाईपैकी 60% टीव्हीमधून आणि 40% यूट्यूबमधून येतात. मी मेहनत करायला कधीच घाबरत नाही. जर कोणी मला माइक सोडून मेहनत करायला सांगितलं, तर मी त्यासाठीही तयार आहे. असं ही तिने या पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे. यूट्यूबवर प्रामाणिकपणे आणि मेहनत करून काम केल्यास तितकाच चांगला फायदा मिळतो. "मी टीव्हीवर एका दिवसात जेवढे पैसे कमावते, तेवढे यूट्यूबवर एका महिन्यात कमावते. मला दोन्ही माध्यमं खूप आवडतात असं ही ती म्हणाली. 

नक्की वाचा - Dog Lovers च्या मनाला भिडणारा चित्रपट, प्रत्येक सीनला कोसळेल रडू, केलीय बजेटच्या 7 पट कमाई

भारतीने हेही सांगितलं की तिने यूट्यूब चॅनेल सुरू करण्याचा निर्णय का घेतला. तिने सांगितलं की तिचा पती हर्ष लिंबाचियाने तिला सल्ला दिला होता की टीव्हीचं युग हळूहळू कमी होत आहे. भविष्यात यूट्यूबचं वर्चस्व असेल. सुरुवातीला भारतीला तिचं वैयक्तिक आयुष्य व्लॉगच्या माध्यमातून लोकांसमोर आणायला संकोच वाटला. पण जेव्हा तिने व्लॉगिंग सुरू केली, तेव्हा तिला प्रेक्षकांचं खूप प्रेम आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला. "जेव्हा कमेंट्स येऊ लागल्या आणि लोकांचं प्रेम मिळालं, तेव्हा खूप मजा आली, आणि जेव्हा पैसेही मिळायला लागले, तेव्हा तर आणखी जास्त मजा आली," असं भारती हसत हसत म्हणाली. त्यानंतर आता युट्यूबवरही लक्ष देत असल्याचं तिने सांगितलं. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com