जाहिरात

Kapil Sharma: कॉमेडियन कपिल शर्मासह बॉलिवूडच्या या कलाकारांना धमकी, तक्रार दाखल - सूत्र

Kapil Sharma Death Threats : ईमेलद्वारे बॉलिवूड कलाकारांना धमकी देण्यात आल्याचे प्रकरण समोर आलंय, ईमेलच्या शेवटी बिश्नोईच्या नावाचाही उल्लेखही आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संबंधित ईमेल पाकिस्तानातून पाठवण्यात आला होता. 

Kapil Sharma: कॉमेडियन कपिल शर्मासह बॉलिवूडच्या या कलाकारांना धमकी, तक्रार दाखल - सूत्र

Kapil Sharma Death Threats : कॉमेडियन कपिल शर्मासह बॉलिवूडमधील तीन कलाकारांना ईमेलद्वारे धमकी देण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल शर्माव्यतिरिक्त राजपाल यादव, कॉरिओग्राफर रेमो डिसूझा आणि सुगंधा मिश्रालाही ईमेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुंबई पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसी सूत्रांच्या माहितीनुसार, राजपाल यादव आणि सुगंधा मिश्राने FIR दाखल केलीय तर रेमो डिसूझानेही तक्रार नोंदवलीय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

सूत्रांच्या माहितीनुसार, या सर्व कलाकारांना ईमेलद्वारे धमकी मिळालीय आणि ईमेलच्या शेवटी बिश्नोईच्या नावाचा उल्लेख आहे.  प्राथमिक तपासामध्ये संबंधित मेल पाकिस्तानातून पाठवण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.  

(नक्की वाचा: Saif Ali Khan : सैफकडे आलेली 15 हजार कोटींची संपत्ती नेमकी कुणाची? शत्रू संपत्ती संकल्पना नेमकी काय आहे?)

राजपाल यादवला धमकीचा मेल कधी आला? 

राजपाल यादवला 14 डिसेंबर 2024 रोजी धमकीचा ईमेल आला, त्यानंतर 17 डिसेंबर 2024 रोजी त्याने एफआयआर दाखल केली. तर रेमो डिसूझालाही आठवडाभरापूर्वीच धमकीचा मेल आला होता.  

ईमेल काय लिहिण्यात आलंय?

तीनही कलाकारांना पाठवण्यात आलेल्या धमकीच्या ईमेलमध्ये लिहिण्यात आले होते की, "आम्ही तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहोत आणि आम्हाला वाटते की आम्ही एक संवेदनशील बाब तुमच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे. हा पब्लिसिटी स्टंट किंवा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न नाही. हा मेसेज गांभीर्याने घ्यावा. असे न केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात, ज्यामुळे तुमचे व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवन प्रभावित होऊ शकते. पुढील आठ तासांच्या आत आम्ही तुमच्याकडून प्रतिसादाची अपेक्षा करत आहोत. जर आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, तर आम्ही असे गृहीत धरू की तुम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेत नाही आहात आणि आम्ही आवश्यक ती कारवाई करू."

(नक्की वाचा - Saif Ali Khan : हल्लेखोरापेक्षा पिळदार शरीरयष्टी, तरीही अभिनेता स्वत:चा बचाव का करू शकला नाही? अखेर कारण समोर)

लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावे यापूर्वीही देण्यात आलीय धमकी  

गेल्या काही दिवसांत बॉलिवूड कलाकारांपासून ते राजकीय नेत्यापर्यंत अनेकांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावे धमकी देण्यात आल्याची प्रकरणे समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वीच बिहारमधील एका मंत्र्यालाही बिश्नोई गँगच्या नावे धमकी मिळाली होती. यानंतर बिहारच्या मंत्र्यांना पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com