जाहिरात
Story ProgressBack

वादग्रस्त चित्रपट 'हमारे बारह'ला उच्च न्यायालयाकडून ग्रीन सिग्नल, कधी होणार प्रदर्शित?

या चित्रपटाविरोधात केलेल्या याचिकेत मुस्लीम आस्थेसह मुस्लीम महिलांचा अपमान केला गेला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Read Time: 2 mins
वादग्रस्त चित्रपट 'हमारे बारह'ला उच्च न्यायालयाकडून ग्रीन सिग्नल, कधी होणार प्रदर्शित?
मुंबई:

'हमारे बारह' या वादग्रस्त चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विविध वादात अडकलेला या चित्रपटाला न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने काही बदलांसह चित्रपट प्रदर्शित करण्यास हिरवा कंदी दिला आहे. चित्रपटाबाबत कोर्टाने सांगितलं की, या चित्रपटात मुस्लीम समाजाबद्दल काहीच नाही. मात्र काही दृश्यांवर आक्षेप घेतला जाऊ शकतो. यानंतर कोर्टाने दोन्ही गटाला एकमेकांसोबत बोलून विषय सोडवण्याच्या सूचना केल्या आहेत. 

या चित्रपटात अनु कपूर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट यापूर्वी 7 जून रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र वादात अडकल्यामुळे चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. या चित्रपटाविरोधात केलेल्या याचिकेत मुस्लीम आस्थेसह मुस्लीम महिलांचा अपमान केला गेला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

मंगळवारी 19 जून रोजी झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने काही संवाद म्युट करण्याचे आदेश दिले आहेत.  सोबतच कोर्टाने या चित्रपटाच्या ट्रेलरवर आक्षेप घेत निर्मात्यांवर पाच लाखांचा दंड ठोठावला. कोर्टाने सांगितलं की, हा चित्रपट ट्रेलरपेक्षा वेगळा आहे आणि एक चांगला सामाजिक संदेश देते. 

नक्की वाचा - Hershey's सिरपमध्ये सापडला उंदीर, कंपनी म्हणते....

हमारे बारहचा ट्रेलर 30 मे रोजी प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या 24 तासात हटवण्यात आला. या ट्रेलरमधील लोकसंख्या नियंत्रणाच्या मुद्द्यावर निर्मिती केलेल्या या चित्रपटाच्या काही दृश्य आणि संवादावर आक्षेप नोंदवण्यात आला होता. या चित्रपटात मुस्लीम समुदायाचा अपमान करण्यात आल्याचा आरोप आहे. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे महाराष्ट्रातील अध्यक्ष इम्पियाज जलील यांनी आरोप केला होता की, चित्रपटाचं नाव हम दो हमारे बारह असं होतं. जे नंतर हमारे बारह असं करण्यात आलं. या चित्रपटात मुस्लीम समाजावर निशाणा ठेवण्यात आला. चित्रपटाचा उद्देश वाद निर्माण करून पैसे कमावणे आहे, असाही आरोप चित्रपटावर करण्यात आला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
गायिका अलका याज्ञिकला दुर्मिळ आजार, दोन्ही कानांवर गंभीर परिणाम
वादग्रस्त चित्रपट 'हमारे बारह'ला उच्च न्यायालयाकडून ग्रीन सिग्नल, कधी होणार प्रदर्शित?
abhishek-bachchan-buys-6-luxury-apartments-in-whopping-price-at-mumbai
Next Article
अभिषेक बच्चननं मुंबईत खरेदी केले 6 फ्लॅट, किंमत वाचून बसेल धक्का
;