जाहिरात

BMC Election 2026: मुंबईत हिंदू-मुस्लिमांची लोकसंख्या किती? 30 टक्के मराठी मतदान कोणाच्या पारड्यात? जाणून घ्या

मराठीच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवण्याचा जोरदार प्रयत्न ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केला जात आहे.अशातच मुंबईत धार्मिक आणि जातीय समीकरण असणार आहे का? जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

BMC Election 2026: मुंबईत हिंदू-मुस्लिमांची लोकसंख्या किती? 30 टक्के मराठी मतदान कोणाच्या पारड्यात? जाणून घ्या
BMC Election 2026 Latest News
मुंबई:

BMC Election 2026 Voting Calculation : राज्यात 29 महानगरपालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरु असून उद्या गुरुवारी 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अशातच सर्वांच लक्ष 75 हजार कोटींचं बजेट असणाऱ्या मुंबई महानगर पालिकेवर लागलं आहे. या महापालिकेत 227 वॉर्डमध्ये निवडणूक रंगणार आहे. मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी असा राजकीय संघर्षही होणार असल्याचं बोललं जात आहे. मराठीच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवण्याचा जोरदार प्रयत्न ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केला जात आहे.अशातच मुंबईत धार्मिक आणि जातीय समीकरण असणार आहे का? जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे केंद्र असलेल्या मुंबईची एकूण लोकसंख्या जवळपास 1.87 कोटी (महानगरपालिका क्षेत्र)असल्याचं सांगितलं जातं. संपूर्ण महानगर प्रदेशाची (MMR) लोकसंख्या अंदाजे 2.7 कोटी आहे. मुंबईत 67.39 % हिंदू 18.56% मुस्लिम आणि जैन धर्माचे 4 टक्के लोक आहेत. तर  ख्रिश्चनांची संख्या 3.72% आहे. उर्वरित लोकसंख्येमध्ये शीख,पारशी आणि इतर धर्मांचे लोक आहेत. 

बीएमसी निवडणुकीत किती जागा?

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीत 227 प्रभागांसाठी निवडणूक होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी)ने मनसेसोबत युती केली आहे. जवळपास 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा दबदबा आहे. तसच या निवडणुकीत भाजपाने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती केली आहे. 

नक्की वाचा >> 'जागा वाटपासाठी नाही, शिवसेना-मनसेची युती ही फक्त..', ठाण्याच्या सभेत उद्धव ठाकरेंनी Inside Story सांगितली

सर्वाधिक मराठी मतदार

बीएमसीच्या 227 निवडणूक प्रभागांच्या जातीय समीकरणांनुसार, मराठी,उत्तर भारतीय,मुस्लिम,गुजराती आणि मारवाडी मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. 2017 मध्ये बीएमसी निवडणुकीत 227 नगरसेवक निवडून आले होते.त्यापैकी जवळपास 150 ते 155 नगरसेवक मराठी भाषिक होते. अमराठी लोकांमध्ये 72 ते 76 नगरसेवक उत्तर भारतीय,गुजराती आणि मुस्लिम होते. ठाकरे बंधूंसह शिंदे गटाचा भर ‘मराठी माणूस'या मु्द्द्यावर आहे. 
तर भाजप मराठी आणि उत्तर भारतीय दोघांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.

मतदारांचे अंदाजे प्रमाण

  • मराठी : 25 ते 30 टक्के
  • उत्तर भारतीय : 22 ते 25 टक्के
  • मुस्लिम : 20 ते 21 टक्के
  • गुजराती,मारवाडी : 17 टक्के
  • दक्षिण भारतीय व इतर : 11 टक्के

नवी मुंबईची लोकसंख्या 

नवी मुंबईची लोकसंख्या देखील मुंबई शहराच्या तुलनेत वेगाने वाढत आहे. तिथे हिंदू लोकसंख्या जवळपास 80 टक्के असून मुस्लिम लोकसंख्या 9 टक्क्यांपर्यंत आहे. बीएमसी,नवी मुंबई महानगरपालिका याशिवाय पुणे,नागपूर,अमरावती,सोलापूरसह 29 ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत.

सर्वात जास्त मराठी मुंबईत

मुंबईत जवळपास 30 टक्के मतदार मराठी आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राज ठाकरेंच्या मनसेनं मराठी मतांसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.मध्य मुंबईतील दादर,परळ,लालबागपासून गिरगाव आणि जुन्या निवासी भागांमध्ये मराठी मतदार सर्वाधिक आहेत.बीएमसीमधील 40 ते 45 टक्के नगरसेवक हे याच वर्गातून येतात.

नक्की वाचा >> Thane News: "विकला जाणारा मी महाराष्ट्र सैनिक नाही, माझी पत्नी..",राज ठाकरेंच्या सभेआधीच ठाण्यात खळबळ! Video

यूपी, बिहारचा कुठे जोर?

अमराठी मतदारांबद्दल बोलायचे झाल्यास मुंबईत 20 ते 25 टक्के उत्तर भारतीय मतदार आहेत.यामध्ये जवळपास 80 टक्के उत्तर प्रदेश आणि बिहारशी संबंधित आहेत.कांदिवली,कुर्ला,गोरेगाव,मालाड,मीरा-भाईंदर आणि घाटकोपर येथे उत्तर भारतीयांची संख्या जास्त आहे.भाजपासोबत काँग्रेसही या मतदारांवर भर देत आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com