जाहिरात
Story ProgressBack

आजीचा पुष्पा-2च्या रोमँटिक गाण्यावरील धमाकेदार डान्स, लोक म्हणाले - रॉकिंग आजी

अभिनेता आणि डिजिटल कंटेंट क्रीएटर अक्षय पार्थने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Read Time: 2 mins
आजीचा पुष्पा-2च्या रोमँटिक गाण्यावरील धमाकेदार डान्स, लोक म्हणाले - रॉकिंग आजी
आजी-नातवाचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Pushpa 2 Movie: सोशल मीडियावर बॉलिवूड कलाकार आणि इंफ्लूएंसर्सचेही डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. डान्स व्हिडीओच्या शर्यतीत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचाच सहभाग पाहायला मिळतो. वयोवृद्ध महिला देखील आपले कौशल्य सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर मांडत आहेत. सध्या सोशल मीडियावर अशाच एक आजीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. 'पुष्पा-2' सिनेमातील नव्याकोऱ्या रोमँटिक गाण्यावर क्युट एक्सप्रेशनसह आजीने केलेल्या डान्सचा व्हिडीओ युजर्संना खूप आवडत आहे. अभिनेता आणि डिजिटल कंटेंट क्रीएटर अक्षय पार्थने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. आजीच्या या डान्स व्हिडीओवर युजर्संनी लाइक व कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. 

(नक्की वाचा:महाराज सिनेमासाठी अभिनेत्याचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, 5 महिन्यांत घटवले 26 किलो वजन)

पुष्पा-2च्या रोमँटिक गाण्यावर आजीचा लयभारी डान्स

कंटेट क्रीएटर अक्षय पार्थने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आजीने बहुचर्चित सिनेमा पुष्पा-2च्या 'अंगारोका' या कपल साँगवर भन्नाट डान्स केला आहे. आजीचे एक्सप्रेशन देखील लय भारी आहेत. पुष्पा-2 सिनेमाचे हे गाणं गायिका श्रेया घोषालने गायले आहे. हेच गाणे आजीने आपल्या नातवासोबत रीक्रिएट केले आहे. केवळ दोन दिवसांत हा व्हिडीओ तीन मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे.  

(नक्की वाचा: 53 वर्षांपूर्वी या चित्रपटाने दोन खलनायकांना हिरो बनवलं होतं, प्रदर्शनाच्या काही दिवसांतच झाला होता अभिनेत्रीचा मृत्यू)

6 डिसेंबरला सिनेमा होणार रिलीज 

2021मध्ये रिलीज झालेल्या 'पुष्पा : द राइज' सिनेमाचा सीक्वेल 'पुष्पा -2'मधील गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तेलुगू भाषेतील sooseki गाणे लोकप्रिय गायिका श्रेया घोषालने गायले आहे. सिनेरसिकांमध्ये सध्या या कपल साँगची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. 'पुष्पा : द रूल' हा सिनेमा 6 डिसेंबर 2024ला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.  सिनेरसिक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

(नक्की वाचा: अमिताभ आज पण 'सिकंदर' पण फोटोतले 'ते' 3 जण गायब, जाणून घ्या पद्मिनी, राजदूत, चेतकची कहाणी)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
नाना पाटेकरला मोठ्या मुलाचा का होता तिरस्कार? अडीच वर्षांचा असतानाच झालं निधन
आजीचा पुष्पा-2च्या रोमँटिक गाण्यावरील धमाकेदार डान्स, लोक म्हणाले - रॉकिंग आजी
actress Hina Khan Diagnosed third stage breast cancer
Next Article
अभिनेत्री हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान; सोशल मीडियावर दिली माहिती
;