Sunny Deol Angry Video: जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी सकाळी ब्रीज कँडी रुग्णालयातून त्याना डिस्चार्ज मिळाला. मात्र त्याआधी रुग्णालयाता उपचार सुरु असताना त्यांच्या मृत्यूच्या उलट सुटल चर्चा सोशल मिडिया, माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. यावरून हेमा मालिनी आणि इशा देओल यांनी चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्याना फटकारलं होतं.
आता धर्मेंद्र यांचे पुत्र सनी देओलने देखील पापाराझी आणि मीडियावर संताप व्यक्त केला आहे. आज सकाळी सनी देओल घराबाहेर पडला त्यावेळी सवयीप्रमाणे पापाराझींना त्याला गाठलं आणि फोटो आणि व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. धर्मेंद्र यांच्या तब्येतीच्या चिंतेत असताना पापाराझींना फोटो आणि व्हिडीओ काढताना पाहून, सनी देओलचा पारा चढला.
पाहा VIDEO
(नक्की वाचा- Dharmendra : धर्मेंद्रचा एकही रुपया हेमा मालिनीला मिळणार नाही? कोणाला सर्वाधिक भाग, कायदा काय सांगतो?)
यावेळी सनी देओलचा संयम सुटला आणि त्याने आपला राग व्यक्त केला. "तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुमच्या घरात आई-वडील आहेत, तुमची मुलं आहेत. आणि तुम्ही व्हिडीओ, फोटो काढत आहात, लाज नाही वाटत", असा संताप सनी देओलने व्यक्त केला. सनी देओलच्या चेहऱ्यावरील तणाव आणि राग स्पष्ट दिसून येत होता.
सगळं देवाच्या हातात- हेमा मालिनी
हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत माहिती देताना सांगितले की, “गेल्या काही दिवसांत आम्ही खूप तणावाखाली होतो. आमच्यासाठी हा कठीण काळ होता. धरमजींची तब्येत आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. मुलं रात्री झोपत नव्हती. पण आता ते घरी परतले आहेत. त्यांना कुटुंबीयांसोबत राहणे गरजेचं आहे. यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे. बाकी सगळं देवाच्या हातात आहे. कृपया त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा.”