Deepak Chahar in Bigg Boss: "क्रिकेटपेक्षा कठीण...", क्रिकेटर दीपक चहरची 'बिग बॉस 19' मध्ये एंट्री

'बिग बॉस' बद्दल विचारले असता दीपक चहर म्हणाला, "मला वाटते क्रिकेटपेक्षा बिग बॉस जास्त कठीण आहे, कारण घरात तुमचे खरे शत्रू कोण आहेत आणि मित्र कोण आहेत, हे कधीच कळत नाही." 

जाहिरात
Read Time: 2 mins

Deepak Chahar': टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुखापतीमुळे काही काळापासून बाहेर आहे. 2018 मध्ये पदार्पण करून आपल्या वेगवान गोलंदाजीने त्याने सर्वांना प्रभावित केले होते. परंतु 2023 पासून तो टीम इंडियातून बाहेर आहे. क्रिकेटच्या मैदानापासून दूर असूनही, दीपक चहरने 'बिग बॉस' (Bigg Boss) या प्रसिद्ध रिॲलिटी शोमध्ये हजेरी लावून चाहत्यांना चकित केलं.

चहरच्या 'वाइल्डकार्ड' एन्ट्री

दीपक चहरच्या या अचानक एंट्रीमुळे तो 'बिग बॉस 19' मध्ये वाइल्डकार्ड स्पर्धक म्हणून दाखल होणार असल्याची अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरली होती.  'X' हँडलवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, दीपक चहर होस्ट सलमान खानसोबत स्टेजवर संवाद साधताना दिसला. सलमान खान व्हिडिओमध्ये म्हणत आहे की, "आम्ही कधीपासून वाट पाहत होतो की या सीझनचा दुसरा वाइल्डकार्ड कोण असेल?" 

(नक्की वाचा- Suraj Chavan Bigg Boss Marathi 5 Winner: सुरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोची पहिली झलक समोर, लग्नसोहळा कसा असेल?)

'बिग बॉस' बद्दल विचारले असता दीपक चहर म्हणाला, "मला वाटते क्रिकेटपेक्षा बिग बॉस जास्त कठीण आहे, कारण घरात तुमचे खरे शत्रू कोण आहेत आणि मित्र कोण आहेत, हे कधीच कळत नाही." 

मालती चहर आहे दुसरी वाइल्डकार्ड

चाहत्यांचे सर्व दावे खोटे ठरले. दीपक चहर हा स्पर्धक म्हणून घरात गेलेला नाही. तर दीपक चहरची बहीण, मालती चहर हिला घरात सोडण्यासाठी गेला होता. मालती चहर ही या सीझनची दुसरी वाइल्डकार्ड स्पर्धक आहे. यापूर्वी शेहबाज बदेशा याने पहिला वाइल्डकार्ड म्हणून घरात प्रवेश केला होता.

Advertisement
Topics mentioned in this article