Deepika Padukone Second Pregnancy: बॉलिवूड विश्वातील पॉवरफुल कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. अभिनेत्री दिपिका पदुकोणने एका गोड फोटोद्वारे तिच्या दुसऱ्यांदा गरोदर असल्याची गुड न्यूज केली आहे. मुलगी दुआला जन्म दिल्यानंतर दोन वर्षांनी दीपिका पदुकोण पुन्हा गरोदर आहे. तिने ही आनंदाची बातमी स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हटके अंदाजात शेअर केली आहे.
रणवीर- दीपिका दुसऱ्यांदा होणार आईबाबा!
बॉलिवूडची बाजीराव अन् मस्तानी दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. स्वत: अभिनेत्री दीपिका पदुकोणने आपल्या चाहत्यांशी ही गूड न्यूज शेअर केली आहे. दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये रणवीर सिंग त्यांची मुलगी दुआला मांडीवर घेऊन बसलेला दिसत आहे. फोटोमध्ये रणवीरचा चेहरा दिसत नाही आणि दुआचा अर्धा चेहरा झाकलेला आहे. मात्र, या फोटोचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे चिमुकल्या दुआच्या हातात असलेले प्रेग्नन्सी किट.
मुलगी दुआने दिली Good News
दीपिका आणि रणवीरने दुआच्या माध्यमातून त्यांच्या दुसऱ्यांदा गरोदर असल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्रीने हा मनमोहक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन नजरबट्टू इमोजींसह शेअर केला आहे. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत, या जोडप्यावर इंस्टाग्रामवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भूमी पेडणेकर, सामंथा रुथ प्रभू यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या या घोषणेवर आनंद व्यक्त केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world