Dharmendra 90th Birthday: हिंदीसिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले. वयाच्या 89व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. देओल कुटुंबीयांनी त्यांच्या पार्थिवावर अतिशय गुप्तपणे अंत्यसंस्कार केले. लाडक्या अभिनेत्याचं अंतिम दर्शन घेता न आल्याने चाहते नाराज झाले होते. यानंतर बुधवारी (3 डिसेंबर) हरिद्वार येथे त्यांच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या. दरम्यान 8 डिसेंबर रोजी धर्मेंद्र यांचा 90वा वाढदिवस आहे. सनी-बॉबीने त्यांचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्यासाठी मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आलीय.
धर्मेंद्र यांचा 90वा जन्मदिन
8 डिसेंबर रोजी सनी देओल आणि बॉबी देओल वडील धर्मेंद्र यांचा 90वा वाढदिवस लोणावळ्यातील फार्महाऊसवर साजरा करणार असल्याचे म्हटलं जातंय. विशेष म्हणजे चाहत्यांनाही फार्महाऊवर प्रवेश मिळणार आहे. लेजेंड देओल या X हँडलवर पोस्ट शेअर करण्यात आलीय. 8 डिसेंबर रोजी धर्मेंद्र यांचा वाढदिवस चाहत्यांसोबत साजरा केला जाईल. देओल कुटुंबीय धरम पाजींच्या चाहत्यांना भेटणार आहेत. दुपारी 1 वाजता सेलिब्रेशन सुरू होईल, फार्महाऊसवर चाहत्यांना थेट एण्ट्री असणार आहे, कोणत्याही प्रकारच्या पासची आवश्यकता नाही. दरम्यान याबाबत देओल कुटुंबीयांकडून अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
(नक्की वाचा: Dharmendra News: एकमेव कॉमेडियन ज्याला हीरो घाबरायचे, पण धर्मेंद्र यांच्यासमोर ते देखील जोडायचे हात)
(नक्की वाचा: Dharmendra News: धर्मेंद्र यांनी फक्त 1.5 कोटीमध्ये खरेदी केला होता जुहूतील बंगला, आताची किंमत ऐकून बसेल धक्का)
धर्मेंद्र यांचं फिल्मी करिअर
धर्मेंद्र हे हिंदी सिनेसृष्टीतील मोठे नाव होते. धर्मेंद्र यांनी 1960 साली 'दिल भी तेरा हम भी तेरे' या सिनेमाद्वारे करिअरची सुरुवात केली होती. पहिल्याच सिनेमामध्येच धर्मेंद्र यांची जादू मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली. यानंतर त्यांनी 'अनपढ़', 'बंदिनी', 'मेरा गांव मेरा देश', 'शोले', 'धरम-वीर', 'तहलका' यासारखे शानदार सिनेमे इंडस्ट्रीला दिले. धर्मेंद्र यांनी आपल्या करिअरमध्ये बलराज साहनी, राज कपूर, संजीव कुमार, अमिताभ बच्चन आणि अमरीश पुरी यांच्यासह काम केलंय. आताच्या पिढीतील कलाकार उदाहरणार्थ रणबीर सिंह, शाहिद कपूर, आलिया भट्ट यासह अन्य कलाकारांसोबतही त्यांनी सिल्व्हर स्क्रीन शेअर केलीय.