Dharmendra News: धर्मेंद्र दमदार अभिनयाबरोबच त्यांच्या लुकसाठीही ओळखले जायचे. याहून अधिक लोक त्यांच्या उदार स्वभावावर फिदा होते. धर्मेंद्र हे एक असे अभिनेते होते ज्यांचे आयुष्य पूर्णपणे स्वच्छ आरशाप्रमाणे होते. मोठ्या पडद्यावरील त्यांचा रोमान्स, त्यांनी केलेली मजामस्ती, त्यांची भांडणं सर्वकाही जगासमोर उघड होती. विशेष म्हणजे धर्मेंद्र स्वतःच स्वतःचे किस्से सांगायला मागेपुढे पाहत नसत. त्यांनी कपिल शर्माच्या शोमध्येही एका विनोदी अभिनेत्यासंदर्भातील गंमतीशीर किस्सा सांगितला होता.
कट हा शब्द ऐकताच विनोदी अभिनेत्याने काय केलं?
कपिल शर्मा शोच्या एका एपिसोडमध्ये ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा एकत्रित सहभागी झाले होते. यावेळेस काही अभिनेत्यांचे फोटो दाखवण्यात आले होते, त्यामध्ये मेहमूद यांच्या फोटोचाही समावेश होता. फोटो पाहताच धर्मेंद्र यांनी मेहमूद यांच्या आठवणींना उजाळा दिला. धर्मेंद्र यांनी म्हटलं की, मेहमूद हा एकमेव कॉमेडियन होता, ज्याला धर्मेंद्र सोडून सर्व हीरो घाबरायचे. धर्मेंद्र यांच्या विधानावर सेटवर एकच हशा पिकला.
धर्मेंद्र यांनी पुढे सांगितलं की, मेहमूदसोबत त्यांनी 'नीला आकाश' हा सिनेमा केला होता. त्यावेळेस शुटिंगदरम्यान ते स्वतः पायलट आणिन मेहमूद को-पायलटच्या भूमिकेत होते. स्वतःच्या सवयीनुसार मेहमूदने धर्मेंद्र यांच्यासोबत मजामस्करी करण्यास सुरुवात केली. पण धर्मेंद्र यांनी अचानक कट म्हटलं आणि विचारलं पायलट कोण आहे? तेव्हा मेहमूद म्हणाले तू आहेस माझा बाप. त्यांचा हा अंदाज पाहून कार्यक्रमामध्ये सर्वजण मोठ्याने हसू लागले.
(नक्की वाचा: Dharmendra News: धर्मेंद्र यांनी फक्त 1.5 कोटीमध्ये खरेदी केला होता जुहूतील बंगला, आताची किंमत ऐकून बसेल धक्का)
(नक्की वाचा: Dharmendra: धर्मेंद्र यांच्या डुप्लिकेटला पाहून चाहते झाले भावुक, व्हिडीओ होतोय व्हायरल)
शत्रुघ्न सिन्हा यांचे हात बांधलेले होते, मग पुढे काय झालं?
यादरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील 'प्यार ही प्यार' सिनेमातील किस्सा सांगितला. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, सिनेमातील एका सीनमध्ये त्यांचे हात बांधलेले होते आणि तोंडावरही कापडी पट्टी होती. शुटिंग पूर्ण झाल्यानंतर सिनेमाच्या हीरोइन वैजयंती माला तेथे आल्या. धर्मेंद्र आणि वैजयंती माला दोघंही एकमेकांशी बोलत होते. त्यावेळेस शत्रुघ्न सिन्हा छोट्या-मोठ्या भूमिका करत होते, त्यांचा स्ट्रगल काळ सुरू आहे. म्हणूनच युनिटमधील कोणालाही त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचं वाटलं नसावे, त्यावेळेस शत्रुघ्न सिन्हा यांचे हात बांधलेले असल्याची गोष्टी धर्मेंद्र यांच्या लक्षात आली. धर्मेंद्र यांनी स्वतःहून जाऊन शत्रुघ्न यांचे हात सोडले आणि तोंडावरील पट्टी काढली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world