Eknath Shinde Birthday : 'बाळासाहेबांप्रमाणे एकनाथ शिंदेंनी शिवसेना घडवली', आशा भोसले स्पष्ट बोलल्या!

Eknath Shinde birthday wishes : आज राज्यभरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 61 वा वाढदिवस साजरा केला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Eknath Shinde 61st birthday : आज राज्यभरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 61 वा वाढदिवस साजरा केला जात आहे. पक्षाकडून आणि कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या खास दिवशी खुद्द गाणसम्राधी आशा भोसले यांनी उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Best wishes to Eknath Shinde from Asha Bhosle)

आशा भोसले यांनी थेट गाणं गात एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'तुम जियो हज़ारों साल साल के दिन हों पचास हज़ार' गाणं गात आशा भोसलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आशा ताई पुढे म्हणाले, तुम्ही मला फार आवडता. तुम्ही काम करीत होता हे आम्हाला माहिती नव्हतं.

नक्की वाचा - Delhi election result: दिल्लीत बाजी भाजपची, पण चर्चा मात्र अजित पवारांच्या 23 उमेदवारांची, कारण काय?

अचानकपणे तुम्ही सर्वांसमोर आलात.  ज्याप्रकारे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना घडवली, तशीत तुम्ही पुन्हा एकदा शिवसेना घडवली. त्यामुळे मला तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही हिमतीनं आलात. त्यावेळी सर्वजण तुमच्यावर धावून आले होते. मात्र  विरोध करणाऱ्यांना तुम्ही धाडसाने तोंड दिलं.

Advertisement

त्यात तुम्ही यशस्वीही झालात. पुढेही अधिक यशस्वी व्हाल असा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. शतायुषी व्हा आणि असंच चांगलं कार्य करीत राहाल.  चांगलं काम करणारा कधीही संपत नसतो. 

नातेवाईकांसोबत सेलिब्रेशन...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज 61 वा वाढदिवस साजरा केला जात आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिंदेंच्या ठाण्यातील शुभ-दीप निवासस्थानी नातेबाईकांसोबत खास सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे यांनी औक्षण करीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान राज्यातील आरोग्य सेवा बळकट व्हावी यासाठी मोबाइल व्हॅन, रुग्णवाहिकांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं.  
 

Advertisement