Dharmendra has been discharged from Hospital : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता धर्मेंद्रने आपल्या जबरदस्त अभिनयाने मोठं नाव कमावलं. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांच्या चाहत्यांची संख्या कोणत्याही तरुण अभिनेत्यापेक्षा अधिक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्याचं वृत्त समोर आलं होतं.
त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचंही सांगितलं जात होतं. दोन दिवसांपासून त्यांच्या निधनाचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती.
दरम्यान धर्मेंद्रच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. धर्मेंद्रला रुग्णालयातून डिस्चार्च देण्यात आला आहे. कुटुंबाने धर्मेंद्रला घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतल्याचं ब्रीड कँडी रुग्णालयाकडून सांगण्यात आलं. यापुढे त्यांच्यावर घरातून उपचार केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
नक्की वाचा - Dharmendra : धर्मेंद्रचा एकही रुपया हेमा मालिनीला मिळणार नाही? ४५० कोटींपैकी कोणाला सर्वाधिक भाग, कायदा काय सांगतो?
गेल्या दोन दिवसांपासून बॉलिवूडमधील मोठमोठे अभिनेते धर्मेंद्रला भेटण्यासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात येत होते. अगदी सलमान खानपासून डिंपल कपाडियापर्यंतचे अभिनेता-अभिनेत्री धर्मेंद्रच्या भेटीसाठी येत आहेत. धर्मेंद्र यांच्या निधनाचं वृत्त व्हायरल झाल्यानंतर हेमा मालिनीसह इशा देओल यांनी सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला. वडिलांची प्रकृती सुधारत असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान आज सकाळी धर्मेंद्रला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापुढे त्यांच्यावर घरातून उपचार केले जातील अशी माहिती आहे.