Dharmendra News: सुपरस्टार धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कुटुंब, नातेवाईकांसह चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर भावुक पोस्टही शेअर केली होती. ज्यामध्ये त्यांनी वैयक्तिक झालेले नुकसान शब्दांत मांडता येणार नाही, अशी भावना व्यक्त केली होती. दुसरीकडे धर्मेंद्र यांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी एका दिग्दर्शकाने हेमा मालिनींची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केलं. या दिग्दर्शकानं शेअर केलेल्या पोस्टमुळे चाहते आणखी भावुक झाले आहेत. पहिल्यांदा कोणातरी समोर बसून हेमांनी आपल्या मनातील वेदना व्यक्त केल्या आहेत, ज्या भावनांना त्यांनी आतापर्यंत वाट मोकळी करून दिली नव्हती. धर्मेंद्र यांच्या अपूर्ण कविता, त्यांचे लपवलेलं दुःख आणि चाहत्यांना अखेरचं दर्शन न मिळण्याबाबतचा पश्चाताप इत्यादी गोष्टी सांगितल्या. हेमा यांच्या प्रत्येक शब्दातून धर्मेंद्र यांच्याप्रति असलेले प्रेम आणि त्यांच्या जाण्याचे दुःख स्पष्टपणे दिसत होते. युएईतील चित्रपट दिग्दर्शक हमद अल रेयामी यांनी हेमा मालिनींची भेट घेतली, याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलीय.
"दुःख पाहणं अतिशय कठीण"
युएईतील चित्रपट दिग्दर्शक हमद अल रेयामी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिलंय की, "शांत खोली, वेदनादायी वातावरण आणि समोर बसलेल्या हेमा मालिनी. आतून पूर्णपणे तुटल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती, ज्याचे वर्णन करणं कठीण आहे. थरथरत्या आवाजात त्या पहिल्यांदा म्हणाल्या की, काश त्या दिवशी मी फार्म हाऊसवर हजर असते. हास्यामागे त्यांनी दुःख लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. यानंतर धर्मेंद्र यांच्या कवितांच्या आठवणींनाही उजाळा दिला. सुंदर कविता प्रकाशित का करत नाही, असे हेमांनी अनेकदा धर्मेंद्र यांना विचारलं होतं. त्यावर धर्मेंद्र म्हणायचे की, "आता नाही, आधी मला आणखी काहीतरी लिहू दे". पण नशिबाने त्यांना वेळच दिला नाही. त्या कविता आजही अपूर्णच आहेत आणि त्यांच्या कविता जग आता कधीही वाचू शकणार नाही.
(नक्की वाचा: Dharmendra News: नवस, प्रार्थना, अश्रू... धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया, भाईजानला भावना अनावर)
हेमा मालिनींना या गोष्टीचा कायम राहील पश्चाताप
हेमा मालिनी यांनी जड अंतःकरणाने सांगितलं की, जगाने कधीही त्यांना कमकुवत किंवा आजारपणाच्या स्थितीत पाहावं, अशी धर्मेंद्र यांची इच्छा नव्हती. नातेवाईकांसमोरही ते आपलं दुःख मांडत नसत. धर्मेंद्र यांनी कायम स्वतःच्या वेदना लपवल्या आहेत, असेही हेमांनी सांगितलं. शेवटच्या दिवसांत त्यांची प्रकृती इतकी खालावली होती की त्यांना कोणीही पाहू शकले नसते. संभाषणाच्या शेवटी फोटोबाबत चर्चा झाली त्यावेळेस हेमा यांनी तेच वेदना लपवणारं स्मितहास्य केलं, यावेळेस पुन्हा एकदा धर्मेंद्र यांच्या आठवणी ताज्या झाल्या.
(नक्की वाचा: Hema Malini Video: विशीतील हेमा मालिनींचा 57 वर्षांपूर्वीचा VIDEO VIRAL, अप्सरेहून सुंदर दिसतेय ड्रिम गर्ल)
धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये निधन झालं. दरम्यान हमद अल रेयामी यांनी धर्मेंद्र यांची त्यांच्या फार्म हाऊसवर भेट घेतलीय, ते धर्मेंद्र यांचे पक्के फॅन होते.