Deepti Bhatnagar In Dharmendra Family : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या कुटुंबात पूजा देओल आणि तान्या देओल नेहमीच प्रकाशझोतापासून दूर राहिल्या आहेत, तर त्यांची तिसरी सून दीप्ती भटनागर एकेकाळी घराघरात ओळखला जाणारा चेहरा होता. ९० च्या दशकात दूरदर्शनवरील प्रसिद्ध शो ‘यात्रा'मुळे फेमस झालेल्या दीप्तीने केवळ टीव्हीवरच नाही तर चित्रपटांमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली. दीप्ती भटनागर यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मेरठ येथे झाला होता. त्यांनी करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. सौंदर्य आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेलली दीप्ती एका बोल्ड जाहिरातीमुळे चर्चेत आली. ही जाहिरात त्या काळात इतकी वादग्रस्त ठरली की नंतर ती केवळ टेलिव्हिजन चॅनेल्सवरूनच नाही तर यूट्यूबवरूनही हटवण्यात आली.
फक्त १८ वर्षांच्या वयात दीप्तीने मिस इंडिया हा किताब जिंकून सगळ्यांना आश्चर्यचकित केले. त्या वेळी अनेकांना अपेक्षा नव्हती की मेरठसारख्या छोट्या शहरातील एक मुलगी इतकी मोठी कामगिरी करेल, पण दीप्तीने आपल्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने हे सिद्ध करून दाखवले. मॉडेलिंगमध्ये नाव कमावल्यानंतर दीप्ती भटनागर यांनी आपली ओळख मर्यादित ठेवली नाही.
नक्की वाचा >> Viral Video: ताजमहालचा 'हा' भाग आजपर्यंत कोणीच पाहिला नाही! एकाने गुपचूप काढला व्हिडीओ, 'ते' सत्य आलं समोर!
दीप्ती हॉकी आणि बॅडमिंटनची राज्यस्तरीय खेळाडू
त्यांनी खेळांमध्येही आपला कौशल्य दाखवले. कमी लोकांना माहिती आहे की दीप्ती राज्यस्तरावर हॉकी आणि बॅडमिंटनच्या खेळाडू राहिल्या आहेत. त्यांचा पहिला चित्रपट ‘राम शास्त्र' (संजय गुप्ता यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला) होता. सुरुवातीच्या काळात त्यांना खूप मेहनत करावी लागली, पण लवकरच त्यांना आमिर खानसोबत ‘मन' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 35.45 कोटी रुपयांची कमाई करून हिट ठरला.

नक्की वाचा >> Sleeping Tips : डोक्याखाली कितीही उशा ठेवल्या तरी झोप लागत नाही, दुधात फक्त 'हे' मिसळा..रात्रभर ढाराढूर झोपाल!
दीप्तीने हिंदीसोबतच तेलुगू, तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले. पण त्यांना खरी ओळख स्टार प्लसवरील लोकप्रिय ट्रॅव्हल शो ‘मुसाफिर हूँ यारों'मुळे मिळाली, ज्याचे त्यांनी केवळ होस्टिंगच केले नाही तर आपल्या साधेपणा आणि स्टाइलने प्रेक्षकांची मने जिंकली. दीप्तीने ‘यात्रा' शोद्वारे भारतीय टेलिव्हिजनवरील पहिली महिला ट्रॅव्हल शो होस्ट बनून इतिहास रचला. मार्च 2001 मध्ये दीप्तीला सलमान खानच्या ‘चोरी चोरी चुपके चुपके' या चित्रपटात एक डान्स नंबर मिळाला, ज्याने बॉक्स ऑफिसवर तब्बल 149 कोटी रुपयांची कमाई केली. आज जरी दीप्ती भटनागर चित्रपटांपासून दूर असल्या, तरी त्यांचा साधेपणा, सौंदर्य आणि देओल कुटुंबाशी असलेला संबंध त्यांना आजही खास बनवतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world