जाहिरात

Dharmendra News: धर्मेंद्र यांच्या दोन मुली बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर; विजेता आणि अजीता काय करतात?

Dharmendra Deol Family: धर्मेंद्र आणि त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांना चार मुले आहेत. ज्यात दोन मुले आणि दोन मुली आहेत. सनी देओल, बॉबी देओल, विजेता देओल आणि अजीता देओल अशी त्यांची नावे.

Dharmendra News: धर्मेंद्र यांच्या दोन मुली बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर; विजेता आणि अजीता काय करतात?

Dharmendra Deol News: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्च मिळाल्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत होती. मात्र अचानक त्यांच्या निधनाची बातमी आल्याने अनेकांना धक्का बसला. IANS ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

धर्मेंद्र यांच्या निधनाच्या दु:खद प्रसंगी संपूर्ण परिवार एकत्र दिसला. धर्मेंद्र यांच्या पश्चात दोन पत्नी आणि सहा मुले आहेत. धर्मेंद्र यांची मुले सनी देओल, बॉबी देओल, इशा देओल, अहाना देओल यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. मात्र विजेता आणि अजीता या दोन्ही मुली लाईलाईट पासून दूरच राहिल्या.

पहिल्या पत्नीपासून चार मुले

धर्मेंद्र आणि त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांना चार मुले आहेत. ज्यात दोन मुले आणि दोन मुली आहेत. सनी देओल, बॉबी देओल, विजेता देओल आणि अजीता देओल अशी त्यांची नावे. विजेता आणि अजीता यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकांना माहिती नाही. प्रकाश कौर यांच्याप्रमाणे दोन्ही मुली फिल्म इंडस्ट्रीच्या झडमगाटापासून दूर आहेत. दोघींची लग्न झाले असून त्यांनी आपल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे.

Dharmendra

(नक्की वाचा- Actor Dharmendra Passes Away: बॉलिवूडचा ही-मॅन हरपला! दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन)

विजेता काय करतात?

धर्मेंद्र यांची मोठी मुलगी विजेताचा विवाह राजकमल होल्डिंग्ज अँड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक असलेले उद्योगपती विवेक गिल यांच्याशी झाला आहे. विजेता आणि विवेक यांचा विवाह 1988 रोजी झाला होता. या जोडप्याला दोन मुले देखील आहेत. विजेता तिच्या पती आणि मुलांसह दिल्लीत राहते. विजेता "विजेता प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड" नावाची एक प्रोडक्शन कंपनी देखील चालवते. सनी देओल अनेकदा या प्रोडक्शन हाऊसद्वारे त्याचे चित्रपट प्रदर्शित करतो.

(नक्की वाचा-  Dharmendra : निधनाच्या काही तासांपूर्वी धर्मेंद्रच्या शेवटच्या चित्रपटाचा पोस्टर; Voice नोट ऐकून चाहते भावुक)

अजीता अमेरिकेत स्थायिक

धर्मेंद्र यांची दुसरी मुलगी अजीता यांचं लग्न अमेरिकेतील दंतचिकित्सक किरण चौधरी यांच्याशी झालं आहे. अजीता यांना दोन मुली आहेत. त्या दोघीही त्यांच्या वडिलांप्रमाणेच डॉक्टर आहेत. अजीता स्वतः अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील एका शाळेत मानसशास्त्र शिक्षिका आहे. धर्मेंद्र यांचे हे दोन्ही जावई प्रसिद्धीपासून दूर असले तरी अनेकदा कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहतात.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com