जाहिरात

Bollywood News: शाहरुख, सलमान, रजनीकांत जवळपासही नाहीत; 'हा' अभिनेता देशातील सर्वात जास्त कमाई करणारा स्टार

Bollywood News: बॉलिवुड सुपरस्टार रणवीर सिंह हा 'धुरंधर' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता बनला आहे.

Bollywood News: शाहरुख, सलमान, रजनीकांत जवळपासही नाहीत; 'हा' अभिनेता देशातील सर्वात जास्त कमाई करणारा स्टार

भारतीय चित्रपटसृष्टीत काही वर्षांपूर्वीपर्यंत एखाद्या अभिनेत्यासाठी 10 कोटी रुपयांची फी ही खूप मोठी मानली जात होती. 90 च्या दशकात चिरंजीवी, कमल हासन आणि श्रीदेवी हे प्रति चित्रपट 1 कोटी रुपये घेणारे पहिले भारतीय स्टार बनले होते. त्यानंतरच्या दशकात  शाहरुख, सलमान, आमिर खान यांनी बॉलिवुडवर राज्य करत आपले मानधन अनेक पटींनी वाढवले. तर गेल्या दशकात रजनीकांत, यश आणि अल्लू अर्जुन सारख्या प्रादेशिक स्टार्सनी एका चित्रपटासाठी 200 कोटींहून अधिक मानधन घेऊन अव्वल स्थान पटकावले होते. परंतु, 2026 मध्ये एका बॉलिवुड स्टारने पुन्हा एकदा या सर्वांना मागे टाकत नंबर वनचे स्थान मिळवले आहे आणि विशेष म्हणजे तो कोणताही 'खान' नाही. 'धुरंधर' चित्रपटाच्या ऐतिहासिक यशानंतर रणवीर सिंह आता भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता बनला आहे.

'धुरंधर'ची जगभरात कमावले 3200 कोटींची कमाई

एकाच वेळी शूट केलेल्या आणि अत्यंत यशस्वी ठरलेल्या 'धुरंधर' या ड्युओलॉजी चित्रपटात रणवीर सिंहने मुख्य भूमिका साकारली. या दोन्ही चित्रपटांनी जगभरात 3200 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली, ज्यामध्ये एकट्या भारतात 1900 कोटी रुपयांच्या नेट कमाईचा समावेश आहे.

अशी झाली 325 कोटींची कमाई

रिपोर्ट्सनुसार, रणवीरने या चित्रपटासाठी कोणतीही ठराविक फी घेतली नव्हती, तर त्याऐवजी त्याने 'प्रॉफिट-शेयरिंग मॉडेल' निवडले होते. चित्रपटाचे बजेट वाढल्यानंतर रणवीरने स्वतःचे पैसेही या निर्मितीमध्ये लावले. यामुळे चित्रपटाच्या एकूण नफ्यातील त्याचा हिस्सा आणखी वाढला.

(नक्की वाचा-  JD Vance यांच्या भारत-पाकिस्तानातील 2 आवडत्या व्यक्ती; एक आसिम मुनीर, तर भारतीय व्यक्तीचं नाव चकीत करणारं)

ट्रेड विश्लेषकांच्या अंदाजानुसार, डिस्ट्रिब्युशन शेअर, थिएट्रीकल बोनस आणि नॉन-थिएट्रीकल सोर्सेस (डिजिटल, सॅटेलाइट आणि म्युझिक राइट्स) मिळून रणवीर सिंहच्या वाट्याला तब्बल 325 कोटी रुपये आले आहेत. कोणत्याही एका प्रोजेक्टसाठी एखाद्या भारतीय अभिनेत्याला मिळालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम आहे. या नफ्यातील सर्वात मोठा वाटा जिओ स्टुडिओज आणि आदित्य धर यांच्या B62 स्टुडिओजला मिळाला आहे.

रणवीरने मोडला रजनीकांत अन् शाहरुख खानचा रेकॉर्ड

रणवीर सिंहने 300 कोटींचा टप्पा ओलांडण्यापूर्वी हा विक्रम दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या नावावर होता.

  • रणवीर सिंह- धुरंधर - 325 कोटी+
  • रजनीकांत- जेलर - 250 कोटी+
  • अल्लू अर्जुन - पुष्पा 2- 200 कोटी+
  • प्रभास- कल्कि 2898 एडी - 200 कोटी+
  • शाहरुख खान- पठाण / जवान -200 कोटी (प्रति चित्रपट)

2010 च्या दशकात आमिर खान आणि सलमान खान यांच्याकडे असणारा हा रेकॉर्ड 2023 मध्ये शाहरुख खानने आपल्या नावावर केला होता. मात्र, आता 2026 मध्ये रणवीर सिंहने भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढून एक नवा इतिहास रचला आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com