Dhurandhar OTT release date: बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दिग्दर्शक आदित्य धर यांच्या 'धुरंधर' (Ranveer Singh's spy thriller Dhurandhar Movie) या स्पाय थ्रिलर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडलेत. या चित्रपटाने केवळ 16 दिवसांत 500 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून कमाईचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. (Dhurandhar Movie Box Office Collection) विशेष म्हणजे, शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने 18 दिवसांत ही कमाई केली होती, तो विक्रम आता 'धुरंधर'ने मोडीत काढला आहे.
नक्की वाचा: "सर्वच चुकीचे गातात..", धुरंधर अक्षय खन्नाच्या FA9LA गाण्याचे बोल आहेत तरी काय? खुद्द गायकाने सर्वच सांगितलं
'धुरंधर'ने मोडला शाहरूख खान याच्या 'जवान'चा विक्रम
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, धुरंधर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाचा घोडदौड अजिबात मंदावलेली नाही. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने पहिल्या आठवड्यापेक्षाही अधिक कमाई केली, सहसा हे चित्र चित्रपटांबाबतीत बघायला मिळत नाही. 'धुरंधर' आता हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात जलद गतीने 500 कोटी कमावणारा 'आउटराइट' बॉलीवूड चित्रपट ठरला आहे. भारतीय सिनेसृष्टीचा विचार करता, अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' नंतर हा दुसरा सर्वात वेगवान कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
'धुरंधर' Netflix वर कधीपासून बघता येणार ?
चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील यशानंतर धुरंधर चित्रपट ओटीटीवर कधी रिलीज होणार, (Dhurandhar OTT Release Date) याची सिनेरसिकांनाची प्रतीक्षा आहे. नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे डिजिटल हक्क 130 कोटी रुपयांना विकत घेतले असून, 30 जानेवारी 2026 रोजी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट केवळ हिंदीच नव्हे, तर दाक्षिणात्य भाषांमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे.
नक्की वाचा: Dhurandhar सिनेमातील Washma Butt प्रसंगाची इंटरनेटवर तुफान चर्चा, तुम्हाला समजला का अर्थ?
दुसरा भाग 2026 मध्ये प्रदर्शित होणार
धुरंधर चित्रपटावरून इतका सुपरहिट का ठरला? याचं अनेकजण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत आहेत. दमदार कथानकत आणि कलाकारांच्या अभिनयामुळे हा चित्रपट यशस्वी झाल्याचे समीक्षकांचे म्हणणे आहे. या चित्रपटात एका गुप्तहेराची कथा दाखवण्यात आली आहे. सांगतो. जीवावर उदार होऊन हा गुप्तहेर कराचीच्या गुन्हेगारी आणि राजकीय वर्तुळात शिरकाव करतो असं दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रणवीर सिंह याने आजवरची सर्वोत्तम भूमिका साकारल्याचेही समीक्षकांचे म्हणणे आहे. संजय दत्त आणि आर. माधवन आणि अक्षय खन्ना यांनी केलेल्या भूमिकांचेही प्रचंड कौतुक होत आहे. दोन भागांच्या या मालिकेतील हा पहिला भाग असून पुढचा भाग 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world