जाहिरात

लग्नात 'रहमान डकैत'ची एन्ट्री होताच पाहुण्यांच्या नजरा खिळल्या, 50 लाखांहून जास्त लोकांनी पाहिला Video

लग्न समारंभात एक व्यक्ती चक्क 'धुरंधर'मधील 'रहमान डकैत'सारख्याच गेटअपमध्ये एंट्री घेताना दिसतो.हा व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले आहेत

लग्नात 'रहमान डकैत'ची एन्ट्री होताच पाहुण्यांच्या नजरा खिळल्या,  50 लाखांहून जास्त लोकांनी पाहिला Video
rehman daikait wedding entry video

Rehman Daikait Entry Video :  ‘धुरंधर'चा क्रेझ अजूनही कमी झालेला नाही.चित्रपटातील दमदार डायलॉग्स,स्टायलिश लुक्स आणि विशेषतः रहमान डकैतची एंट्री सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंड होत आहे.चित्रपटातील गाणी आजही रील्समध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहेत. रहमान डकैत आणि हंमजा अली यांचे मजेशीर व्हिडीओही व्हायरल होत आहेत. लोक अक्षय खन्नाच्या एंट्रीवरील डान्सचे नवे-नवे स्टेप्सही करून दाखवत आहेत.अलीकडेच सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात एका लग्न समारंभात एक व्यक्ती चक्क 'धुरंधर'मधील 'रहमान डकैत'सारख्याच गेटअपमध्ये एंट्री घेताना दिसतो.हा व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.

लग्नात ‘रहमान डकैत' स्टाईल एंट्री

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक व्यक्ती लग्नाच्या वेन्यूमध्ये हिरव्या कार्पेटवरून हळूहळू चालत प्रवेश करत आहे.त्याच्या दोन्ही बाजूंना लाइट्स आणि फुलांची आकर्षक सजावट केलेली आहे. त्याने काळ्या रंगाचा कुर्ता‑पायजामा परिधान केले आहे आणि त्याचसोबत जबरदस्त  सनग्लासमुळे त्याचं सौंदर्य आणखी खुललं आहे. त्याची चालण्याची स्टाईल अगदी चित्रपटातील रहमान डकैतच्या एंट्रीसारखी वाटते..

या व्हिडिओला 5.2 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज

तेथे उपस्थित पाहुणे हे दृश्य बघून थक्क होतात. मागे चमचमणाऱ्या लाईट्स आणि सुंदर सजावटीमुळे संपूर्ण सीन एकदम सिनेमॅटिक दिसतो, ज्यामुळे हा व्हिडिओ आणखी खास बनला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @yogesh.telang15 या हॅन्डलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 5.2 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आणि 77 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये म्हटलंय की,“अक्षय खन्नाची जशीच्या तशी कॉपी!”दुसरा युजर म्हणाला, “१ नंबर ब्रो, सुपर एंट्री".“एक क्षण वाटलं खरा अक्षय खन्ना आला",असंही एका यूजरने म्हटलं. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com