जाहिरात

आई होती सलमानची गर्लफ्रेंड, नवरा सुपरस्टार..अजय देवगणच्या 'शिवाय' मध्ये झळकली, ही अभिनेत्री आहे तरी कोण?

दिलीप कुमार यांच्या आठवणी आजही लोकांच्या मनात ताज्या आहेत.पण तुम्हाला माहिती आहे का? त्यांच्या कुटुंबात अशी एक सौंदर्यवती आहे जी सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आई होती सलमानची गर्लफ्रेंड, नवरा सुपरस्टार..अजय देवगणच्या 'शिवाय' मध्ये झळकली, ही अभिनेत्री आहे तरी कोण?
Who Is Sayyeshaa Saigal
मुंबई:

Dilip Kumars Granddaughter Sayyeshaa Saigal:  इंडियन सिनेमाचे ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार हे केवळ त्यांच्या अप्रतिम अभिनयासाठीच नव्हे तर व्यक्तिमत्त्वासाठीही ओळखले जात होते. दिलीप कुमार यांच्या आठवणी आजही लोकांच्या मनात ताज्या आहेत.पण तुम्हाला माहिती आहे का? त्यांच्या कुटुंबात अशी एक सौंदर्यवती आहे जी सोशल मीडियावर चर्चेत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून दिलीप कुमार यांची नात सायशा सहगल आहे. सायशा दिसायला खूप सुंदर आहे आणि तिचा ग्लॅमरस अंदाज कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.सोशल मीडियावर तिचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. जाणून घेऊयात सायशा सेहगलबाबत सविस्तर माहिती.

सायशाने अखिल चित्रपटामधून करिअरची सुरुवात केली

सायशाने 2015 मध्ये नागार्जुन यांचा मुलगा अखिल अक्किनेनीसोबत तेलुगू चित्रपट‘अखिल'मधून चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटात तिच्या साधेपणाला आणि अभिनय कौशल्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.2016 मध्ये सायशाने अजय देवगणच्या‘शिवाय'या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.तिच्या निरागसतेने आणि एक्सप्रेशन्सने लोकांची मने जिंकली.चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला नाही.

Latest and Breaking News on NDTV

पण सायशाच्या सौंदर्याने आणि परफॉर्मन्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. सायशा सहगल दिलीप कुमार यांची नात आहे.ती सायरा बानो यांचा भाऊ सुलतान अहमद यांची मुलगी शाहीन बानो आणि 90 च्या दशकातील अभिनेता सुमित सहगल यांची कन्या आहे. सायशा दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या कुटुंबातील महत्त्वाची सदस्य आहे.

नक्की वाचा >> Alia Bhatt Video: 32 व्या वर्षी आई झाली..वाढलेलं वजन झरझर केलं कमी! कमी वेळात गंगुबाई कशी झाली फिट?

2019 मध्ये सायशाने सुपरस्टार आर्यासोबत लग्न केलं

सायशाने तिचा बॉयफ्रेंड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील हँडसम स्टार आर्याशी 2019 मध्ये लग्न केले.दोघांची जोडी ‘पॉवर कपल'म्हणून प्रसिद्ध आहे आणि सोशल मीडियावर त्यांचे रोमँटिक फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. सायशा इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे आणि तिचे 4.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.ती नेहमीच तिचे सुंदर फोटो,फॅशन शूट्स आणि फॅमिली मोमेंट्स शेअर करते. 

नक्की वाचा >> "सर्वात मोठा धोका..",महिलेनं धावत्या ट्रेनमध्ये शिजवली मॅगी! Video व्हायरल होताच मध्य रेल्वेने उचललं कठोर पाऊल

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com