बॉलिवूडमध्ये कोणत्या ना कोणत्या काळात कोणी ना कोणी तरी सुपर स्टार राहीला आहे. त्या पैकीच एक म्हणजे दिलीप कुमार. त्यांची जाग कोणीही घेवू शकला नाही. दिलीप कुमार म्हटलं म्हणजे रोमान्स, एक्शन आणि ट्रॅजेडी किंग म्हणून त्यांची ओळख. अभिनयात तर त्यांचा कोणी हात धरू शकत नाही अशी स्थिती होती. त्याच वेळी अजून एक स्ट्रार चाहत्यांवर राज्य करत होते. ते म्हणजे राजकुमार. दिलीप कुमार आणि राज कुमार यांच्यात तशी चांगली मैत्री होती. पण राजकुमार हे थोडे मुडी होते. मात्र एका घटनेने या दोघांमध्ये दरी निर्माण झाली. दोस्ती दुश्मनीमध्ये बदलली. जवळपास 36 वर्षे ही दरी या दोघांत होती.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजकुमार यांनी एका चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी दिलीप कुमार यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर या दोघांमधील संबध बिघडले. दिलीप कुमार यांनी शपथ घेतली. यापुढे राजकुमार यांच्या बरोबर कधीही चित्रपटात काम करणार नाही. मात्र 36 वर्षानंतर या 36 च्या आकड्याला एका चित्रपट निर्मात्याने मोठ्या प्रयत्नानंतर ठिक केले. काय होता तो संपुर्ण किस्सा हे आपण जाणून घेणार आहोत.
राजकुमार यांनी लगावली होती कानशिलात
1959 सालची गोष्ट आहे. रामानंद सागर यांच्या पैगाम चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होते. या चित्रपटात राजकुमार हे मोठ्या भावाची भूमीका करत होते. तर दिलीपकुमार लहान भावाच्या भूमीकेत होते. त्यावेळी दिलीप कुमार हे स्टार होते. तर राज कुमार हे नुकतेच चित्रपट सृष्टीत आले होते. या चित्रपटात एका सिनमध्ये या दोन्ही भावात झटापट होते. या झटापटीत राजकुमार यांनी दिलीप कुमार यांना कानशिलात लगावून दिली. हा फटका इतका जोरात होता की दिलीप कुमार हादरून गेले. हा फटका त्यांच्या गाला ऐवजी त्यांच्या मनाला जास्त लागला. त्यानंतर त्यांनी आपण राजकुमार यांच्या बरोबर कधीही काम करणार नाही असे जाहीर करून टाकले.
ट्रेंडिंग बातमी - ...तर 288 उमेदवारांना पाडू; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
सुभाष घई यांनी घेतला पुढाकार
या घटनेनंतर या दोघांनी कधीही एकत्र काम केले नाही. अनेक वर्षे झाली पण ते एकत्र आले नाहीत. जवळपास 36 वर्षानंतर शोमन म्हणून ओळखले जाणारे सुभाष घई यांनी सौदागर चित्रपटात या दोघांना एकत्र आणण्याचे ठरवले. या चित्रपटात या दोघांनी एक मित्र म्हणून ते दाखवणार होते. त्यावर अनेकांनी सांगितले की हे कठीण आहे. हे दोघे एकत्र येवू शकत नाही. त्यानंतर या चित्रपटाची कथा सुभाष घई यांनी दिलीप कुमार यांना ऐकवली. शिवाय हा रोल आपणच करू शकता असेही सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - मनोज जरांगे आज काय भूमिका घेणार?, सरकारला दिलेला अल्टिमेटमही आज संपणार
त्यावर माझा मित्राची भूमीका कोण करत आहे अशी विचारणा दिलीप कुमार यांनी केली. त्यावेळी सुभाष घई यांनी दिलीप कुमार यांना काही सांगितले नाही. विशेष म्हणजे चित्रपटाचे शुटींगही सुरू झाले. पण या दोन्ही स्टारना आपला मित्र कोण आहे हेच माहित नव्हते. पण जेव्हा शुटींग वेळी हे दोघेही एकमेकां समोर आले तेव्हा दोघेही हबकले. सुभाष घई यांनी केलेली चलाकी त्यांच्या लक्षात आली. पण तोपर्यंत खुप उशीर झाला होता. असं सांगितलं जातं की जेव्हा चित्रपटाचे शुटींग सुरू होते त्यावेळी हे दोघेही एकमेकांबरोबर बोलत नव्हते. या दोघांना बोलायचं असेल काही सांगायचं असेल तर सुभाष घई तो निरोप त्यांना देत होते. या चित्रपटात दोघांनी जोरदार अभिनय केला. चित्रपट बॉक्स ऑफीसवर सुपरडुपर हिट झाला. चित्रपटातील या दोघांचाही अभिनय सर्वांच्याच लक्षाच राहीला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world