जाहिरात

Anurag Kashyap : 'मी मर्यादा विसरलो'; ब्राम्हणांवर केलेल्या वक्तव्यावर अनुराग कश्यपचा माफीनामा

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी केलेल्या जातीवाचक वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.

Anurag Kashyap : 'मी मर्यादा विसरलो'; ब्राम्हणांवर केलेल्या वक्तव्यावर अनुराग कश्यपचा माफीनामा

Anurag Kashyap Apology : चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी केलेल्या जातीवाचक वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान अनुराग कश्यप याने सोशल मीडियावर माफी मागितली आहे. अनुराग कश्यपने मंगळवारी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अनुराग कश्यपने काय म्हटलं?

मी रागात एखाद्याला उत्तर देण्याच्या भरात आपली मर्यादा विसरलो आणि संपूर्ण ब्राम्हण समाजासाठी अपशब्द वापरले. या समाजातील कित्येक लोक माझ्या आयुष्यात राहिले आहेत. आजही ही माणसं माझ्या आयुष्यात योगदान करीत आहेत. आज ती सर्व मंडळी माझ्यावर रागावली आहेत. माझं कुटुंब दु:खी झालंय. मी मानतो असे अनेक बुद्धिजीवी माझ्यावर रागावले आहेत.

Prajakta Mali : प्राजक्ता माळीने अख्ख्या जगालाच केलं चॅलेन्ज, नॉनव्हेज खाण्यावरून तोडले अकलेचे तारे!

नक्की वाचा - Prajakta Mali : प्राजक्ता माळीने अख्ख्या जगालाच केलं चॅलेन्ज, नॉनव्हेज खाण्यावरून तोडले अकलेचे तारे!

मी ज्या पद्धतीने व्यक्त झालो त्यावर संतापले आहेत. असं वक्तव्य करून मी स्वत:च्याच मुद्द्यावरुन भरकटलो. मी अंत:करणातून माफी मागतो. ब्राम्हण समाजाला मी असं बोलू इच्छित नव्हतो, मात्र आवेगात उत्तर देताना असं बोलून गेलो. मी ज्या शब्दांचा उपयोग केला, त्यासाठी मी माझ्या सर्व सहकारी, मित्रांची माफी मागतो. पुढे अशा प्रकारची चूक होऊ नये यासाठी मी लक्ष देईन. आपल्या रागावर काम करेन आणि मुद्द्यांबद्दल सांगायचं झाल्यास योग्य शब्दांचा वापर करेल. तुम्ही मला माफ कराल अशी आशा आहे.  

'फुले' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वादात सापडला होता. समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटावर काही संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. या चित्रपटावर जातीयवाद पसरवल्याचा आरोप केला जात आहे. ब्राह्मणांची केवळ बदनामी यातून केली जात असल्याची संघटनांची नाराजी आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने चित्रपटाच्या प्रदर्शनावरील बंदी आणि ब्राह्मण समुदायाने चित्रपटावर व्यक्त केलेल्या आक्षेपाबाबत सेन्सॉर बोर्ड ऑफ सर्टिफिकेशन (सीबीएफसी) बद्दल एक पोस्ट लिहिली, ज्यामुळे एक नवीन वाद निर्माण झाला.  अनुराग कश्यपने 'ब्राह्मणांवर लघवी करेल' असं वक्तव्य करुन आणखी संताप ओढावून घेतला.