Khushboo Patani VIDEO : अभिनेत्री दिशा पटानीची बहीण खुशबू पटानीने रविवारी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. एका चिमुकल्याचा जीव वाचवताना ती दिसत आहे. बरेलीतील त्यांच्या घरामागील निर्मनुष्य ठिकाणी लहान मुलीला बेवारसपणे सोडून दिलं होतं. खुशबूच्या आईला लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने चिमुकलीचा जीव वाचला.
खुशबूने प्रथम मुलीला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तिला बाहेर काढले. खुशबूने व्हिडिओमध्ये पुढे सांगितले की, कोणीतरी त्या लहान मुलीला त्यांच्या घरामागे सोडले होते. ती तिथेच मातीत पडलेली आढळली. खुशबूने चिमुललीला घरी आणले आणि याबाबत जवळील पोलीस स्टेशनला कल्पना दिली.
त्यानंतर एक पोलीस अधिकारी मुलीला पुढील तपासासाठी घेऊन जात असल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये, खुशबूने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह काही अधिकाऱ्यांना टॅग केले.
पाहा VIDEO
खुशबूने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "कृपया आपल्या देशातील मुलींना वाचवा! हे किती काळ चालणार? मी खात्री करेन की ती योग्य हातात जाईल आणि पुढे तिचे आयुष्य समृद्ध होईल! कारण ज्याच्या नशिबात असते ते घडते."
दिशाची मोठी बहीण माजी भारतीय लष्करी अधिकारी आहे. तसेत ती सोशल मीडियावरही बऱ्यापैकी अॅक्टिव्ह आहे. तिचे दिशा सोबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत.