
सोशल मीडियावर हिंदी सिने विश्वातील अभिनेते- अभिनेत्रींचे नवनवे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा लोकप्रिय कलाकारांच्या बालपणीचे असे फोटो समोर येतात जे पाहून हा हिरो नेमका कोण? असा प्रश्न पडतो. सध्या बॉलिवूडमधील अशाच एका अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विश्वसुंदरी ऐश्वर्या रायसोबत रोमान्स, करिश्मा कपूरसोबत ठरलेला साखरपुडा मोडलेला हा अभिनेता वयाच्या 48 व्या वर्षीही अविवाहित आहे. आत हा अभिनेता कोण हे तुमच्या लक्षात आलंच असेल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहे हा अभिनेता?
आपल्या दमदार अभिनयाने, आव्हानात्मक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. परंतु त्याला बॉलिवूडमध्ये तो मान सन्मान मिळाला नाही, ज्यासाठी तो पात्र होता. या लोकप्रिय अभिनेत्याचे नाव आहे अक्षय खन्ना. 28 मार्च 1975 रोजी मुंबईत जन्मलेला अक्षय खन्ना हा 80 च्या दशकातील स्टार विनोद खन्ना यांचा मुलगा आहे. अभिनेता अक्षय खन्नाने ऊटी येथील बॉम्बे इंटरनॅशनल स्कूल आणि लॉरेन्स स्कूल लव्हडेल येथे शिक्षण घेतले. अभ्यासात त्याला फारसा रस नव्हता, मैदानावर खेळ खेळायला त्याला विशेष आवडायचे.
वयाच्या 17 व्या वर्षी अक्षय खन्ना केवळ नापास होणार हे माहित असल्याने त्याच्या कॉलेजच्या परीक्षेला बसला नाही. अनेक महिने त्याने त्याचे वडील विनोद खन्ना यांना शिक्षण सोडावे लागले हे सत्य सांगण्याचे धाडस झाले नाही. एके दिवशी त्याने धाडस केले आणि आपल्या वडिलांना सत्य सांगितले. मग अक्षय चित्रपटांमध्ये करिअर करेल, हे फिक्स झाले.
नक्की वाचा : Income Taxचे ओझे कमी करा, Mutual Fundवरील करांना कात्री लावा; अर्थमंत्र्यांना विनंती
सिनेविश्वात एन्ट्री...
1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या हिमालय पुत्र चित्रपटातून अक्षय खन्नाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याचे वडील विनोद खन्ना यांनी त्यात पैसे गुंतवले होते म्हणून त्याला हा चित्रपट मिळाला. चित्रपट सुरू होण्यापूर्वी विनोद खन्ना गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धेचे परीक्षक बनले. बिपाशा बसूने ही स्पर्धा जिंकली, त्यावेळी ती चित्रपटांमध्ये आली नव्हती. विनोद खन्ना यांनी बिपाशाची प्रतिभा ओळखली आणि तिला हिमालयपुत्र ऑफर केले, परंतु तिने ती ऑफर नाकारली. बिपाशाच्या नकारानंतर, अंजली झवेरीने अक्षय खन्नासोबत डेब्यू केला.
हिमालय पुत्र बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकला नाही, परंतु या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण अभिनेत्याचा स्टार स्क्रीन पुरस्कार मिळाला. नंतर, अक्षय बॉर्डर, लॉवारीस, आ अब लौट चलें सारख्या चित्रपटांमध्ये दिसला. 1999 मध्ये आलेल्या 'ताल' या हिट चित्रपटामुळे अक्षयला लोकप्रियता मिळाली. 199 मध्येच अक्षयचा दहेक हा चित्रपटही फ्लॉप झाला आणि त्याने एक वर्षाचा ब्रेक घेतला. नंतर 2001 मध्ये त्यांनी 'दिल चाहता है' या चित्रपटातून जोरदार पुनरागमन केले. नंतर, तो रेस, आपकी खतीर, गांधी माय फादर, गली गली चोर है यासारख्या चित्रपटांमध्ये दिसला.
वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत...
दरम्यान, वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, 48 वर्षांचा अक्षय अजूनही अविवाहीत आहे. त्याचे नाव करिश्मा कपूर आणि तारा शर्मा सारख्या अभिनेत्रींशी जोडले गेले. करिश्मा कपूरचे वडील रणधीर कपूर यांना त्यांच्या मुलीचे लग्न त्यांचे जवळचे मित्र विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्ना याच्याशी करायचे होते. जेव्हा त्यांनी विनोद खन्ना यांना हा प्रस्ताव दिला तेव्हा त्यांनी होकार दिला. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण ही बातमी करिश्माची आई बबिता यांना कळताच त्यांनी लग्न करण्यास नकार दिला. बबिताच्या नकारानंतर त्यांचे लग्न मोडले. त्यानंतर तो आजही अविवाहित आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world