Mukta Barve: मुक्ता बर्वेच्या सिनेमाचा रिलीजपूर्वी मोठा रेकॉर्ड,या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिनेमा निवड

Mukta Barve News: मुक्ता बर्वेच्या सिनेमाचा नवा रेकॉर्ड

जाहिरात
Read Time: 2 mins
Mukta Barve News: नववर्षात मुक्ता बर्वेची प्रेक्षकांना नवी भेट
Mukta Barve Instagram

Mukta Barve News: महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री मुक्ता बर्वे नव्या वर्षाची सुरुवात एका खास भेटीसह करतेय. नेहमीच दमदार आणि आव्हानात्मक भूमिका निवडणारी मुक्ता बर्वे 'माया' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शालिनी सिनेमाज् आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स निर्मित 'माया' या सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झालंय. येत्या 27 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

माया सिनेमातील तगडी स्टारकास्ट

भूमिकांच्या निवडीत नेहमीच वेगळेपण जपणारी मुक्ता बर्वे ‘माया'मध्ये प्रमुख आणि प्रभावी भूमिकेत झळकणार आहे. पोस्टरमध्ये मुक्तासोबत सिद्धार्थ चांदेकर, रोहिणी हट्टंगडी आणि डॉ. गिरीश ओक अशी तगडी कलाकारांची फळी दिसतेय. या चित्रपटाची कथा नेमकी काय असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 

माया सिनेमाचा रिलीज होण्यापूर्वीच नवा विक्रम

या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे घोषणेआधीच 'माया'ने आंतरराष्ट्रीय झेप घेतलीय. या चित्रपटाची निवड 24व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालीय. सिनेमाची घोषणा आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड एकाचवेळी समोर आल्यामुळे 'माया' हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरतोय. मुक्ता बर्वेचा प्रत्येक चित्रपट हा अभिनयाचा नवा अनुभव असतो. त्यामुळे 'माया'मधील तिच्या भूमिकेकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

Advertisement

(नक्की वाचा: Punha Ekda Sade Made 3 Teaser: कुरळे ब्रदर्सचा 'नो लेडीज, नो मॅरेज' नियम मोडणार? तीची झालीय जबरदस्त एण्ट्री)

दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, "बिन लग्नाची गोष्टच्या सुखद अनुभवानंतर 'माया' हा चित्रपट घेऊन येत आहे. पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता आणि पुणे इंटरनॅशन फिल्म फेस्टिवलमध्ये निवड होणे या दोन्ही गोष्टी आमच्यासाठी अतिशय समाधानकारक आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल."

निर्माते डॉ. सुनील दातार म्हणतात, " माया हा सिनेमा आमच्यासाठी खूप खास आहे. दमदार कलाकारांची फळी आणि एक वेगळा आशय असलेला हा सिनेमा आम्ही लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. या सिनेमाची कथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे."

Advertisement