Kangana Ranaut: सोशल मीडिया ट्रेंडमध्ये अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) मागे असेल, असं होऊ शकत नाही. नुकतेच कंगनाने सोशल मीडिया ट्रेंड फॉलो करत वर्ष 2016तील तिच्या जीवनातील कटु आठवणींना उजाळा दिलाय. कंगना आणि अभिनेता हृतिक रोशनमध्ये दीर्घकाळ कायदेशीर लढाई सुरू होती, याच घटनेचा तिने सोशल मीडियावर उल्लेख केलाय. पण हे सर्व काही आधीच माहिती असतं तर इतकी दुःखी झाली नसती, असंही तिने पोस्टमध्ये म्हटलंय. कंगनाने सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय, ज्यामध्ये तिने वर्ष 2016मधील जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. वर्ष 2016 हे तिच्यासाठी आणि तिच्या करिअरसाठी शापाप्रमाणे ठरल्याचं तिनं म्हटलं. कायदेशीर प्रकरणांमधून जाणं, मीडिया ट्रायलचा सामना करणं या सर्व गोष्टींचा तिने सामना केला.
सहकाऱ्यानं नोटीस पाठवली अन्...
तिने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की,"अचानक सर्वांना 2016ची आठवण का येतेय? माझ्या करिअरचा वेग सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त वाढतच गेलाय. 'क्वीन' आणि 'तनु वेड्स मनु रीटर्न्स' यासारख्या ब्लॉकबस्टर सिनेमानंतर मी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरले होते. पण जानेवारी 2016 मध्ये माझ्या एका सहकाऱ्याने मला एक वादग्रस्त कायदेशीर नोटीस पाठवली, ज्यामुळे संपूर्ण इंडस्ट्री हादरली आणि दोन गटांमध्ये विभागली गेली."
(नक्की वाचा: Shefali Jariwala Death: "शेफालीवर कुणीतरी काळी जादू केली होती!" पती पराग त्यागीचा खळबळजनक दावा)
अभिनेत्रीनं पुढे लिहिलंय की,"यश विषासारखं ठरलं आणि आयुष्य नरक बनलं. लोक वेगवेगळ्या गटांत विभागले गेले आणि अनेक कायदेशीर लढाया सुरू झाल्या. दहा वर्षांपूर्वी जर मला माहीत असतं की 2026मध्ये मी दरदिवशी जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्सचे सेवन करत असेन, खूप हसत असेन आणि 2016तील सर्व ड्राम्याला काहीही अर्थ उरणार नाही, तर मी तेव्हा इतकी दुःखी झाले नसते. सुदैवाने हे 2016 नाही, आपण 2026 मध्ये आहोत."
(नक्की वाचा: Trending: 80 वर्षाच्या अभिनेत्यानं पत्नीसोबत साजरा केला लग्नाचा वाढदिवस, मुलीपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे बायको)
कंगनाने हृतिक रोशनसोबतचे रिलेशन केले जाहीर
वर्ष 2016मध्ये कंगना आणि हृतिक रोशनच्या नात्याचे सत्य सर्वांसमोर आलं. तिने हृतिकचा 'सील एक्स' असाही उल्लेख केला होता, यानंतर हृतिकने कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवली आणि सार्वजनिकरीत्या माफी मागण्याची मागणी केली. पण हे प्रकरण अधिकच वाढत गेलं आणि कायदेशीर नोटीसांची मालिका अधिक गुंतागुंतीची झाली. कंगनाने हृतिक रोशन आणि त्यांच्या वडिलांवर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोपही केला होता, पण कालांतराने हे प्रकरणही शांत झालं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world