बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. धर्मेंद्र यांची लाडकी लेक इशा देओलदेखील वडिलांच्या निधनाच्या दु:खातून बाहेर येऊ शकलेली नाही. मात्र कामाच्या काही कमिटमेंटमुळे तिला सोशल मीडियावर सक्रिय राहावं लागत आहे. इशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. सोबतच तिने चाहत्यांना विनंती केली आहे की, या कठीण प्रसंगी त्यांनी माझी स्थिती समजून घ्यावी.
पुढे इशाने म्हटलं, जर वर्क कमिटमेंट नसतं तर ती सोशल मीडियापासून दूर गेली असती. मात्र सध्या कामामुळे तिला हे शक्य होत नाही, पुढील काही दिवसात मी त्यासंबंधित पोस्ट शेअर करेल. कृपया मला एक माणूस म्हणून त्यातही सर्वात महत्त्वाचं म्हणजे वडिलांना गमावलेली मुलगी म्हणन पाहा. वडिलांचं निधन हा एसा आघात आहे, ज्यातून बाहेर पडणं मला कठीण जात आहे.

तिने पुढे लिहिलंय, जर गोष्टी माझ्या हातात असत्या तर काही काळासाठी मी या प्लॅटफॉर्मवर राहिली नसते. थोडा वेळ ब्रेक घेतला असता. मात्र मी असं करू शकत नाही. त्यामुळे समजूतदारीने घ्या. तुम्ही दिलेलं प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. ईशा आणि सनी देओल दोघांसाठीही धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कामावर परतणं कठीण जात आहे. सध्या इशा अनेक फोटोशूट आणि जाहिराती करीत आहे.
नुकतेच अभिनेता सनी देओल आगामी चित्रपट बॉर्डर २ च्या ट्रेलर लॉन्चसाठी पोहोचले होते. जिथं ते नाराज दिसत होते. त्यांचे डोळे लाल आणि अश्रूंनी भरलेले होते. मात्र स्टेजवर असल्याकारणाने त्यांनी भावनांना आवर घातला आणि चित्रपटाचा ट्रेलर रिलिजमध्ये सहभागी झाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world