जाहिरात

Priya Marathe Death: 'माझ्या आरोग्याची समस्या', 'ही' होती प्रिया मराठेची अखेरची 'पोस्ट' अन् 'मालिका'

Marathi Actress Priya Marathe Passed Away: तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमध्ये प्रिया शेवटची दिसली. मात्र ही मालिका तिने मध्येच सोडली होती. 

Priya Marathe Death: 'माझ्या आरोग्याची समस्या',  'ही' होती प्रिया मराठेची अखेरची 'पोस्ट' अन् 'मालिका'

Actress Priya Marathe Passed Away:  मराठी तसेच हिंदी मनोरंजन विश्वाला हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन झाले आहे. प्रिया मराठेलाकर्करोगाचे निदान झाले होते. गेल्या वर्षभरापासून ती कॅन्सरशी झुंज देत होती. अखेर तिची कर्करोगाची झुंज अपयशी ठरली. आज पहाटे साडे चार वाजता मीरा रोड येथे तिने अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 38 व्या वर्षी हरहुन्नरी मराठी अभिनेत्री हरपल्याने सिनेविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. 

प्रिया मराठेने आपल्या दमदार अभिनायाच्या जोरावर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. तिने चार दिवस सासूचे, पवित्र रिश्ता, तू तिथे मी, तुझेच गीत मी गात आहे, अशा गाजलेल्या मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमध्ये प्रिया शेवटची दिसली. मात्र ही मालिका तिने मध्येच सोडली होती. 

प्रिया शेवटची ‘तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. परंतु ही मालिकासुद्धा तिने मधेच सोडली होती. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यात तिने आरोग्याचं कारण दिलं होतं. या मालिकेत तिने मोनिकाची भूमिका साकारली होती. शूटिंग आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी सांभाळणे कठीण होत आहे. माझ्या आरोग्याची समस्याही उद्भवली आहे. माझ्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळाले. टीमच्या गरजेनुसार मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते. म्हणूनच मी हा प्रवास इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, असे तिने त्यावेळी स्पष्ट केले होते.

मराठी सिनेसृष्टीतील सुंदर जोडी..

प्रिया मराठे आणि अभिनेते शंतनू मोघे हे मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात सुंदर कपल म्हणून ओळखले जात होते. दोघांचे सोशल मीडियावरील फोटो नेहमीच चाहत्यांचे लक्ष  वेधत होते. मात्र प्रिया मराठेच्या या अकाली निधनाने संपूर्ण मराठी सिनेविश्व हादरुन गेले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com