सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, पोलिसांनी वाढवली सुरक्षा

Salman Khan: बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Salman Khan: कुख्यात गँगस्टर लॉरेन बिश्नोई आणि गोल्डी ब्रारने अनेकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

Bollywood News: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर रविवारी (14 एप्रिल) पहाटेच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. सलमान खानच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी त्याच्या सुरक्षेमध्ये वाढ केली आहे.  

सलमानच्या जीवाला कोणापासून आहे धोका?

सलमान खानच्या जीवाला बिश्नोई गँगपासून धोका आहे. कारण कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्याकडून सलमानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. 

वर्ष 2018मध्ये सलमान खानला जीवे मारण्यासाठी आखली होती योजना

सलमानला मारण्यासाठी बिश्नोई आणि गोल्डीने अनेकदा त्यांचे शूटर्स मुंबईमध्ये पाठवले आहेत. लॉरेन्सचा खास गँगस्टर संपत नेहरा यानेही वर्ष 2018मध्ये सलमान खान वास्तव्यास असलेल्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये रेकी केली होती. पण सलमानवर हल्ला करण्यापूर्वीच हरियाणा पोलिसांनी नेहराच्या मुसक्या आवळल्या. चौकशीदरम्यान त्याने सलमानला जीवे मारण्यासाठी आखलेल्या हल्ल्याची संपूर्ण माहितीही उघड केली होती.

Advertisement

वर्ष 2020मध्ये बिश्नोईने दुसऱ्या शूटरवर सोपवली जबाबदारी

सलमान खानला बिश्नोई गँगपासून धोका असल्याची माहिती मुंबई पोलीस, दिल्ली पोलिसांसह जवळपास सर्व तपास यंत्रणांना आहे. 'रेडी' सिनेमाच्या शूटिंगदरम्यानही लॉरेन्स बिश्नोईने त्याच्या टोळीच्या माध्यमातून सलमानवर हल्ला करण्याची योजना आखली होती, पण काही कारणास्तव ही योजना फसली. यानंतर बिश्नोईने अभिनेत्यावर हल्ला करण्याची जबाबदारी त्याचा खास शूटर नरेश शेट्टीवर सोपवली. झज्जरमधील रहिवासी असलेला नरेश शेट्टी वर्ष 2020मध्ये जवळपास महिनाभर मुंबईमध्ये राहिला आणि यादरम्यान त्याने अनेकदा सलमानच्या घराची रेकी देखील केली. पण बिश्नोई गँगचा हा प्लान देखील फसला.

सलमान खानला जीवे मारण्यामागील हे आहे कारण? 

आपल्या पहिल्या 10 टार्गेट्सच्या यादीमध्ये सलमान खान (Salman Khan) पहिल्या क्रमांकावर आहे, अशी धक्कादायक कबुली लॉरेन्स बिश्नोईने NIAसमोर झालेल्या चौकशीदरम्यान दिली होती. लॉरेन्स बिश्नोईच्या म्हणण्यानुसार, वर्ष 1998मध्ये सलमान खानने एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान जोधपूरमध्ये एका काळ्या हरणाची शिकार केली होती. बिश्नोई समाजाकडून काळविटाची पूजा केली जाते आणि याच कारणामुळे लॉरेन्स बिश्नोईला सलमान खानला (Salman Khan) जीवे मारायचे आहे.

Advertisement

दुसरीकडे दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान लॉरेन्सने सलमानला मारण्याची योजना तीनदा अयशस्वी झाल्याचेही सांगितले होते. यानंतर बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची जबाबदारी त्याचा भाऊ अनमोलवर सोपवली. 

सलमान खानला देण्यात आली आहे Y प्लस सुरक्षा 

काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या कार्यालयामध्येही धमकीचा ई-मेल पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. सलमान खानचा खास व्यक्ती म्हणून ओळख असणारा प्रशांत गुंजाळकरला रोहित गर्गकडून धमकीचा मेल आला होता. या प्रकरणी आयपीसी कलम 506 (2), 120 (बी)  आणि 34 अंतर्गत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बिश्नोई टोळीकडून वारंवार मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सलमानला Y प्लस श्रेणीची सुरक्षा दिली आहे.  

Advertisement

आणखी वाचा 

सलमान खानने चाहत्यांना दिली गुडन्यूज, सुलतान-टायगरनंतर भाईजान दिसणार या भूमिकेत

अक्षय कुमारच्या नावावर फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी घातल्या बेड्या

कधी होता बॉलिवूडचा सुपरहिरो, फ्लॉप झाला आणि सुरू केला ज्युसचा बिझनेस

Topics mentioned in this article