जाहिरात
Story ProgressBack

सलमान खानने चाहत्यांना दिली गुडन्यूज, सुलतान-टायगरनंतर भाईजान दिसणार या भूमिकेत

Salman Khan Movie Sikandar: सलमान खानने आपल्या चाहत्यांना ईदचे गिफ्ट दिले आहे. पुढल्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर भाईजानचा आगामी सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.

Read Time: 2 min
सलमान खानने चाहत्यांना दिली गुडन्यूज, सुलतान-टायगरनंतर भाईजान दिसणार या भूमिकेत

Salman Khan Movie Sikandar: बॉलिवूडचा दबंग सलमान खानने आपल्या चाहत्यांना ईदचे (Eid 2024) खास गिफ्ट दिले आहे. ईदच्या मुहूर्तावर सलमानने आपल्या आगामी सिनेमाच्या नावाची घोषणा केली आहे. वर्ष 2025मध्ये ईदच्याच दिवशी भाईजानचा 'सिकंदर' नावाचा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. 

ए.आर.मुरुगदास सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून साजिद नाडियादवाला या सिनेमाचे निर्माते आहेत. सलमान, साजिद आणि मुरुगदास हे दमदार त्रिकुट 'सिकंदर' सिनेमा घेऊन येत असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

 
दरम्यान सलमान खान आणि निर्माता साजिद नाडियादवाला या सुपरहिट जोडीने यापूर्वीही अनेक धमाकेदार सिनेमे इंडस्ट्रीला दिले आहेत. 'जुडवा', 'मुझसे शादी करोगी', 'किक' यासारख्या कित्येक सुपरहिट सिनेमांमध्ये त्यांनी एकत्रित काम केले. 'किक' सिनेमानंतर प्रेक्षक या जोडीच्या सिनेमाची आतुरतने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. दुसरीकडे ए.आर. मुरुगदास यांच्याबाबत सांगायचे झाले तर त्यांनी बॉलिवूडमधील 'गजनी', 'हॉलिडे: अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्युटी' यासह साऊथमधील अनेक गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. 

सलमान खानने दिली गुडन्यूज 

सिनेमाच्या नावाची घोषणा होताच सलमान खानने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, "या वर्षी 'बडे मियाँ छोटे मियाँ' व 'मैदान' सिनेमा पाहा आणि पुढच्या वर्षी ईदला सिकंदरला येऊन भेटा. सर्वांना ईदच्या शुभेच्छा!" रिपोर्ट्सनुसार, सिकंदर सिनेमा हा अ‍ॅक्शनपट असणार आहे. याद्वारे मोठा सामाजिक संदेश देखील दिला जाणार आहे.  

चाहत्यांची उत्सुकता शिगेला

'सिकंदर' या सिनेमाचे नाव जाहीर केल्यानंतर आता सलमान खानच्या चाहत्यांमध्ये तसेच सिनेरसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सिनेमाची कहाणी नेमक्या कोणत्या विषयावर आधारित असणार आहे? सलमानसोबत आणखी कोणकोणते अभिनेते, अभिनेत्री मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. इतकेच नव्हे तर चाहत्यांनी मोठ्या पडद्यावर हा सिनेमा पाहण्यासाठी आतापासूनच दिवस मोजण्यास सुरुवात केली आहे.  

बॉलिवूडच्या खलनायकाची अनोखी लव्ह स्टोरी, कधीकाळी करत होते बँकेत नोकरी
पापा की परी! खलनायक रणजीतच्या लेकीचा ग्लॅमरस लुक, तुम्ही पाहिले का हे PHOTOS?
Video : तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता... ऐश्वर्याच्या नात्याबाबत काय म्हणाला होता सलमान?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination