Milind Soman Birthday: बॉलिवूडमधील सुपरमॉडेल आणि फिटनेस गुरू मिलिंद सोमणचा आज 60वा वाढदिवस आहे. पण ज्या पद्धतीने मिलिंदने आरोग्याची काळजी घेतलीय त्यानुसार तो तिशीतील तरुणाप्रमाणे दिसतो. अशा पद्धतीने शारीरिकरित्या फिट राहणे मुळीच सोपे नाही. मिलिंदच्या लुकव्यतिरिक्त त्याच्या फिटनेसचेही लाखो चाहते आहेत. मिलिंदने कित्येक मुलाखतींमध्ये त्याचा फिटनेस मंत्र सांगितलाय. अभिनेता रोज साध्या पद्धतीचा नाश्ता करतो, चहा-कॉफी पिणे टाळतो, व्यायाम, योग-ध्यानधारण करण्यावर लक्ष केंद्रित करतो, तेलकट-तिखट पदार्थांपासून दूर राहतो आणि हेच त्याच्या फिटनेसचे सीक्रेट आहे.
वाढदिवसानिमित्त मिलिंद सोमणसाठी पत्नी अंकिताची खास पोस्ट
मिलिंदसाठी रनिंग म्हणजे ध्यान | Milind Soman Fitness Secret
मिलिंदने एका मुलाखतीत सांगितले होते की, निसर्गाच्या सान्निध्यात राहून व्यायाम केल्याने त्याला 15-20 मिनिटांतच दिवसभराची ऊर्जा मिळते. मिलिंद कधी छतावर पावसात व्यायाम करताना, पोहताना, कधी पर्वतीय भागांमध्ये ट्रेक करताना तर कधी सायकल चालवतानाही दिसतो. विशेष म्हणजे तो कधीही निश्चित स्वरुपातील वेळपत्रकाचे पालन करत नाही. तर हवामान, जागा आणि मूडच्या हिशेबाने तो व्यायाम सरावामध्ये बदल करतो. बहुतांश वेळेस तो धावण्याचा व्यायाम करताना दिसतो, त्याच्या मते धावणे हा केवळ व्यायाम नाहीय तर एक विशेष प्रकारचे ध्यान आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय, ज्यामध्ये त्याने या वयातही 80 किलोमीटर अंतर सायकलिंग केलंय.
(नक्की वाचा: Milind Soman: धोतर आणि गळ्यात इंद्र माळा, 60व्या वर्षातही मिलिंद सोमणचा किलर लुक PHOTOS)
सुपर मॉडेल मिलिंद सोमण
मिलिंदचे खास वर्कआउट रुटीन आणि डाएट | Milind Soman Diet Plan Secret
अतिशय अनोख्या पद्धतीने अभिनेता त्याच्या वर्कआउट रुटीनमध्ये बदल करत असतो. सायकलिंगद्वारे पायांच्या आणि पोटाच्या स्नायूंचा व्यायाम होऊन ते मजबूत होतात. बॉडी वेट एक्सरसाइजमध्ये मिलिंदला पुल-अप्सचा सराव करणं आवडतं. जंगलामध्ये एखाद्या झाडाच्या फांदीच्या मदतीनेही तो पुल-अप्स करतो. मिलिंदचे डाएट देखील अतिशय साधे आहे, आहारामध्ये तो फळ-भाज्या, अख्खे धान्य आणि मांसाहाराचा समावेश करतो. पाकिटबंद पदार्थ खाणे टाळतो आणि झोपेस प्राधान्य देतो. अशा पद्धतीने मिलिंदने साठीमध्येही एखाद्या तरुणासारखं निरोगी आणि जबरदस्त शरीरयष्टी कमावलीय.
(नक्की वाचा: Milind Soman: मिलिंद सोमणने मौनी अमावस्येला कुंभमेळ्यात केले स्नान)
(Content Source : IANS)