जाहिरात

Dharmendra: राहिल्या फक्त आठवणी...धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींची पहिली प्रतिक्रिया, शेअर केले फोटो

Dharmendra And Hema Malini Photos: हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत आठवणींना उजाळा दिलाय.

Dharmendra: राहिल्या फक्त आठवणी...धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींची पहिली प्रतिक्रिया, शेअर केले फोटो
"Hema Malini First Post After Darmendra Death: हेमा मालिनी यांची पती धर्मेंद्र यांच्यासाठी पहिली भावुक पोस्ट"
Hema Malini X

Hema Malini First Post After Darmendra Death: बॉलिवूडच्या ड्रीम गर्ल हेमा मालिनी सध्या अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्तीला त्यांनी गमावलंय, ज्यांच्यासोबत संसार थाटण्यासाठी त्यांनी स्वतःच्याच कुटुंबाविरोधात मोठा संघर्ष केला होता. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच हेमा मालिनी स्वतःचे दुःख व्यक्त केलंय. 24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला. यानंतर तीन दिवसांनंतर हेमा यांनी धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा देत सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केलीय. 

पती धर्मेंद्र यांच्या निधनामुळे आयुष्यात निर्माण झालेली पोकळी आणि एक अभिनेता म्हणून हिंदी सिनेसृष्टीतील त्यांना मिळालेले यश याबाबत हेमा मालिनी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर भावना व्यक्त केल्या आहेत.

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांची भावुक पोस्ट

हेमा मालिनींनी पोस्टमध्ये नमूद केलंय की, "धरमजी माझ्यासाठी खूप काही होते. एक प्रेमळ पती, आमच्या दोन्ही मुली ईशा आणि अहानाचे वडील, एक मित्र, मार्गदर्शक, कवी आणि प्रत्येक कठीण काळात मला साथ देणारी पहिली व्यक्ती, ते माझ्यासाठी सर्वस्व होते. त्यांनी चांगल्या वाईट परिस्थितीत मला कायम साथ दिली. मनमिळाऊ स्वभाव आणि सर्वाप्रति प्रेम-आदर दाखवत त्यांनी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आपलेसे केले होते. सार्वजनिक जीवनातही इतके लोकप्रिय आणि यशस्वी असतानाही त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांमध्ये अद्वितीय ठरलं. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांची लोकप्रियता कायमच टिकून राहील."

आयुष्यभराची साथ आणि प्रेमाच्या आठवणींना उजाळा देत हेमा यांनी पुढे लिहिलंय की, "माझे वैयक्तिक नुकसान शब्दांत मांडता येणार नाही. माझ्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी आयुष्यभर राहील. वर्षानुवर्षे एकत्र राहिल्यानंतर ते खास क्षण पुन्हा जगण्यासाठी माझ्याकडे केवळ खूप आठवण उरल्या आहेत".

Hema Malini post about Dharmendra: धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींनी काय म्हटले ?3 दिवसांनी केली पहिली पोस्ट

(नक्की वाचा: Hema Malini post about Dharmendra: धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींनी काय म्हटले ?3 दिवसांनी केली पहिली पोस्ट)

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचे खास फोटो

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे खास फोटो 

भावुक पोस्ट शेअर केल्यानंतर हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत खास फोटो देखील शेअर केले आहेत. 

हे फोटो पाहताना माझ्या भावना उलगडत आहेत : हेमा मालिनी 

Pune News: पुण्याशी धर्मेंद्र आणि त्यांच्या शेवटचा सिनेमा इक्कीसचं खास कनेक्शन, NDTVला दिग्दर्शकाने सांगितलं की थकवा...

(नक्की वाचा: Pune News: पुण्याशी धर्मेंद्र आणि त्यांच्या शेवटचा सिनेमा इक्कीसचं खास कनेक्शन, NDTVला दिग्दर्शकाने सांगितलं की थकवा...)

धर्मेंद्र आणि हेमा यांची प्रेमकहाणी

सिनेमाच्या सेटवर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या प्रेमकहाणीस सुरुवात झाली. विवाहित असतानाही हेमा मालिनींनी धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.   

Dharmendra News: ना सनी ना बॉबी, ICUमधून धर्मेंद्र यांनी या हीरोच्या घरी केला होता फोन; हे झालं शेवटचं बोलणं

(नक्की वाचा: Dharmendra News: ना सनी ना बॉबी, ICUमधून धर्मेंद्र यांनी या हीरोच्या घरी केला होता फोन; हे झालं शेवटचं बोलणं)

अलविदा धर्मेंद्र

धर्मेंद्र देओल यांचं 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करत होते. ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते, यानंतर 12 नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. अखेर 24 नोव्हेंबर रोजी त्यांना या जगाचा निरोप घेतला.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com