जाहिरात

Ajit Pawar: 'काय कवी..?' मी आश्चर्याने मागे वळून पाहिलं तर...; हेमांगी कवीने शेअर केला दादांसोबतचा 'तो' किस्सा

या दिलदार माणसाबद्दल मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हिने एक किस्सा शेअर केला आहे. तिच्या या पोस्टवर खूप जण प्रतिक्रियाही देत आहेत. 

Ajit Pawar: 'काय कवी..?' मी आश्चर्याने मागे वळून पाहिलं तर...; हेमांगी कवीने शेअर केला दादांसोबतचा 'तो' किस्सा

Hemangi Kavi Social Media Post : उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अचानक एक्झिट घेणं मनाला चटका लावणारं आहे. अद्यापदी अजित पवार आपल्यात नाहीत असा लोकांना विश्वास बसत नाहीये. त्यांचे नातेवाईक, कार्यकर्ते, सहकारी, बारामतीकर तर त्यांच्या संपर्कात असलेले आणि ओळखीचे अजित दादांबद्दल भरभरून बोलत आहेत. दादांचा संपर्क दांडगा होता. माणसं त्यांच्या लक्षात राहत. गरज पडेल तेव्हा ते मदतीसाठी धाऊन जात. अशा या दिलदार माणसाबद्दल मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हिने एक किस्सा शेअर केला आहे. तिच्या या पोस्टवर खूप जण प्रतिक्रियाही देत आहेत. 

नक्की वाचा - Ajit Pawar Death: मित्रांनो माझा देव चोरला आज, अजित पवारांसाठी बिग बॉस फेम सुरज चव्हाणची भावुक पोस्ट

हेमांगी कवीची सोशल मीडिया पोस्ट...l Hemangi Kavi Social Media Post

काल सकाळी मी नेहमीप्रमाणे shooting ला गेले. Make up करून, तयार होऊन script वाचनाला आम्ही सगळे जमलो. Scene वाचायला सुरवात करणार तेवढ्यात आमच्या दिग्दर्शक जयंत पवारांच्या फोन वाजला. त्यांच्या आईंचा फोन होता. आमचे दिग्दर्शक म्हणाले “मी breakfast केला का विचारायला फोन केला असेल हां आता आईने” आणि हसत हसत आमच्यासमोरच call घेतला. ते हॅलो बोलणार इतक्यात ते म्हणाले “काय!!!?”आमच्या सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. तिथून त्यांनी काय ऐकलं आम्हांला काहीच कळेना. अगदी थोड्या वेळात त्यांनी फोन ठेवला आणि आम्हांला सांगितलं, “अजित पवार गेले”. आम्ही गोंधळून सगळ्यांनी एकदम विचारलं, “काय, कोण गेलं?”. तर ते हताशपणे म्हणाले “अजितदादा पवार”. हे ऐकल्यावर आम्हांला जो धक्का बसला तो मी इथं शब्दात सांगूच शकत नाही. आम्ही पटापट आमचे आमचे फोन उघडून social media पाहू लागलो कारण आम्ही जे ऐकलं त्यावर आमचा विश्वासच बसत नव्हता. वाटत होतं काहीतरी चुकीचं ऐकलं किंवा काहीतरी नावाचा गोंधळ झाला असेल? Fake news असेल पण सगळ्या social media वर अजितदादांच्या मृत्यूच्या बातम्या दिसू लागल्या. धक्कादायक म्हणजे काय हे काल पुन्हा प्रकर्षाने जाणवलं. आणि ज्याप्रकारे मृत्यू झालाय ते तर आणखी भीषण आहे. आज हे सगळं लिहिताना सुद्धा मला नीट process झालेलं नाहीये. 

१० वर्षांपूर्वीची गोष्ट मी एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे अजितदादांसोबत इतरही नेते सुद्धा आले होते. कार्यक्रम संपता संपता आम्हां कलाकारांना group photo साठी stage वर बोलवलं. कार्यक्रम शासकीय असल्यामुळे सगळे protocols सांभाळून photo काढले जात होते पण stage वर ही गर्दी झाली. GroupPhoto मध्ये सगळे नीट मावावेत म्हणून आम्ही सगळे कलाकार photo साठी line मध्ये पुढे उभे राहीलो, आमच्या मागे VIPs. तेवढ्यात मागून आवाज आला “काय कवी” मी आश्चर्याने मागे वळून पाहिलं तर माझ्या अगदी मागे दादा उभे होते. मी दचकून म्हणाले “Sir तुम्ही?” मला त्यांना विचारयचं होतं “तुम्हांला माझं नाव कसं माहीत?” हे विचारणार तेवढ्यात दादाच म्हणाले “अडनाव कवी आहे तर काय कविता बविता करता की नाही?” मी हसून नाही म्हटलं. “मी फक्त नावाची कवी आहे”. त्यावर त्यांनी विचारलं “आडनाव कवी कसं काय” मग मी थोडक्यात त्यांना सांगितलं. बरं समोर photo काढणं सुरुच होतं. मग मागून कुणीतरी म्हटलं “तुम्ही पुण्याच्या का?” मी ‘नाही' बोलणार इतक्यात दादाच म्हणाले… “अरे त्या ‘माण' तालुक्याच्या आहेत…जयकुमार गोरेच्या गावच्या!” हे सगळं ऐकून मला आता फक्त चक्कर यायची बाकी होती. मी photo bito सोडून अजितदादांकडे बघत राहिले. तर ते त्यांची छानशी smile देत सगळ्यांसोबत photo काढत होते. Photo काढण्याचा कार्यक्रम झाला आणि ते आम्हां सगळ्यांना त्यांच्या विशेष style मध्ये left मनगटात काळ्या पट्ट्याचं घड्याळ घातलेल्या हातानं sharp असा नमस्कार करत ‘चला' म्हणत तरतरतर निघून गेले. घरी येऊन मी ही घटना माझ्या बाबांना सांगितली. मी म्हटलं एवढा मोठा, व्यस्त माणूस माझ्या सारख्या लहान कलाकाराचं नाव कसं लक्षात ठेवतो, Pappa? मी कुठली याचे details ही त्यांना कसे माहीत! त्यावर बाबा म्हणाले “चांगला नेता कायम तळागळ्यातल्या लोकांशी हा असा आपला connect ठेवतो. नावं, details लक्षात ठेवतो. त्यांच्या काकांसारखीच म्हणजे शरद पवारांसारखीच त्यांची memory sharp आहे. मोठ्या नेत्याचं हेच ते लक्षण. उगाच नाही ते उपमुख्यमंत्रीएत!” त्यानंतर अजितदादा मला अगदी ४-५ वेळाच भेटले पण प्रत्येक वेळी त्यांच्या मिश्किल smile ने “काय कवी” म्हणून हाक मारली. काल दिवसभर आणि आताही त्यांचं ते “काय कवी” माझ्या कानात घुमत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com