जाहिरात

Dharmendra News: मला दुःखी करून...धर्मेंद्र यांच्या वाढदिवशी हेमा मालिनींना भावना अनावर; तुम्हालाही रडू कोसळेल

Hema Malini Post For Dharmendra News: धर्मेंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त हेमा मालिनी यांनी खास फोटोंसह भावुक पोस्ट शेअर केलीय.

Dharmendra News: मला दुःखी करून...धर्मेंद्र यांच्या वाढदिवशी हेमा मालिनींना भावना अनावर; तुम्हालाही रडू कोसळेल
"Hema Malini Post For Dharmendra News: आपल्या आठवणी... हेमा मालिनींची धर्मेंद्र यांच्यासाठी खास पोस्ट"
Hema Malini X

Dharmendra Birthday News: दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा आज 90वा जन्मदिन आहे. यानिमित्ताने सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत सर्वजण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. ईशा देओल, अभय देओल, सनी देओलनंतर आता त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर धर्मेंद्र यांच्यासाठी भावुक पोस्ट शेअर केलीय. ही पोस्ट वाचल्यानंतर कोणालाही अश्रू आवरणार नाहीत. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी पूर्णपणे कोलमडल्याचे या पोस्टद्वारे पुन्हा एकदा दिसलंय. 

हेमा मालिनी यांची धर्मेंद्र यांच्यासाठी भावुक पोस्ट | More Than Two Weeks Have Passed Since You Left Me Heartbroken Says Hema Malini

"धरमजी
हॅपी बर्थडे
तुम्ही मला दुःखी करून सोडून गेल्यानंतर दोन आठवड्यांहून अधिक काळ उलटून गेलाय. हळूहळू आयुष्य पुन्हा सावरण्याचा प्रयत्न करतेय. तुम्ही कायमच माझ्यासोबत असाल. आपल्या आयुष्यातील आनंदी आठवणी कधीही पुसल्या जाऊ शकत नाहीत आणि ते क्षण पुन्हा जगल्याने मला खूप समाधान आणि आनंद मिळतोय. आपण एकत्रित घालवलेल्या इतक्या सुंदर वर्षांसाठी, आपल्या दोन सुंदर मुली ज्या आपले प्रेम दर्शवतात, माझ्या हृदयात असणाऱ्या सर्व सुंदर-आनंदी आठवणींसाठी मी देवाचे आभार मानते. तुमच्या जन्मदिनी, देव तुम्हाला शांतता प्रदान करो, अशी मी प्रार्थना करते."

हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सोशल मीडियाद्वारे पहिल्यांदाच व्यक्त झाल्या होत्या.

हेमा मालिनी यांची पहिली पोस्ट | Hema Malini First Post After Dharmendra Death

Sunny Deol Emotional Post: ते कायम माझ्यासोबत आहेत...वडिलांच्या निधनानंतर सनीची पहिली प्रतिक्रिया पाहा VIDEO

(नक्की वाचा: Sunny Deol Emotional Post: ते कायम माझ्यासोबत आहेत...वडिलांच्या निधनानंतर सनीची पहिली प्रतिक्रिया पाहा VIDEO)

हेमा मालिनी यांनी खास पोस्ट फोटोही शेअर केले होते 

Abhay Deol Emotional Post: त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतोय... देओल कुटुंबातील खास सदस्याची धर्मेंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त भावुक पोस्ट

(नक्की वाचा: Abhay Deol Emotional Post: त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतोय... देओल कुटुंबातील खास सदस्याची धर्मेंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त भावुक पोस्ट)

हेमा मालिनी यांनी 'किनारा' सिनेमातील खास आठवणीही सांगितल्या | Hema Malini Insta Post For Dharmendra

Listen to the latest songs, only on JioSaavn.com