Abhay Deol Emotional Post: बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा आज जन्मदिवस आहे. 24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांचं निधन झाले. सेलिब्रिटींसह चाहतेमंडळी त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांच्या कुटुंबाच्या अतिशय जवळ असणाऱ्या एका व्यक्तीनेही सोशल मीडिया भावुक पोस्ट शेअर केलीय.
देओल कुटुंबातील खास सदस्याची भावुक पोस्ट
धर्मेंद्र यांचा पुतण्या अभय देओलने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केलीय. अभयने धर्मेंद्र यांच्यासोबतचा स्वतःच्या बालपणीचा फोटो शेअर केलाय.
अभय देओलने पोस्टमध्ये नेमके काय म्हटलंय?
धर्मेंद्र यांच्यासोबतचा खास फोटो शेअर करत अभयने म्हटलंय की, 'कदाचित 1985 किंवा 86सालातील गोष्ट आहे. कोणीतरी माझ्यावर ओरडल्याने मी नाराज झालो होतो. त्यावेळेस त्यांनी मला बोलावलं, स्वतःजवळ बसवलं आणि म्हणाले की लाइटकडे बघ. मग फोटोग्राफरने हा क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद केला.
अभयने पुढे असंही म्हटलंय की, "मी त्या क्षणाची वाट आतुरतेनं पाहतोय, जेव्हा हेच शब्द ते मला पुन्हा सांगताना मी ऐकेन. जेव्हा माझी वेळ येईल."
धर्मेंद्र आणि अभय देओल यांचे नातं काय?
अभय देओल अभिनेते धर्मेंद्र यांचा पुतण्या आहे. अभय हा धर्मेंद्र यांचा छोटा भाऊ अजीत देओल यांचा मुलगा आहे.
(नक्की वाचा: Dharmendra: धर्मेंद्र पहिल्या सिनेमाचा करार करताना झाले होते निराश, निर्मात्यांनी खिसा रिकामा करून दिले पैसे)
ईशा देओलनंही वडिलांसाठी शेअर केली खास पोस्टTrack Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
