हे बेबी फेम क्युट Angel 17 वर्षांनंतर दिसते अशी, गालावरच्या खळीवर चाहते फिदा

Juanna Sanghvi : 'हे बेबी' सिनेमामध्ये 'क्युट एंजल'ची भूमिका साकारणाऱ्या जुआना सांघवीचा 17 वर्षांनंतरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इतक्या वर्षांनंतर जुआनाला पाहून चाहते भावुक झाले आहेत.  

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • 'हे बेबी' सिनेमामधील क्युट एंजल पुन्हा चर्चेत
  • 17 वर्षांनंतर सोशल मीडियावर फोटो व्हायरल
  • एंजलला मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहण्याची इच्छा
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Juanna Sanghvi: बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि फरदीन खान या त्रिकुटाचा 'हे बेबी' सिनेमा बॉक्सऑफिसवर प्रचंड गाजला होता. वर्ष 2007 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन केले. साजिद खान दिग्दर्शित या सिनेमाची कहाणी अमेरिकन सिनेमा 'थ्री मेन अँड ए बेबी'च्या कथेवर आधारित होती. भावनिक, विनोदी अशा विविध छटा असणारा हा सिनेमा बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरला होता. अक्षय, रितेश आणि फरदीनव्यतिरिक्त सिनेमामध्ये एक गोंडस मुलगी देखील होती, जिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.  

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सिनेमामध्ये क्युट एंजलची भूमिका जुआना सांघवीने निभावली होती. सिनेमाच्या 17 वर्षांनंतर जुआनाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तिचा फोटो पाहून चाहते भावुक झाले आहेत आणि इतक्या वर्षांनंतर तिची झलक पाहून सिनेरसिक आनंदही व्यक्त करत आहेत.

(नक्की वाचा: सुपरस्टार रितेश देशमुख म्हणाला - NDTV मराठी लय भारी)

जुआनाच्या क्युटनेसने चाहत्यांना लावले होते वेड 

'हे बेबी' सिनेमाच्या माध्यमातून क्युट जुआनाने केवळ सिनेरसिकांचेच मन जिंकले नव्हते तर सिनेकलाकारांनाही तिने आपलेसे केले होते. जानेवारी 2022 मध्ये अभिनेता फरदीन खानने 'हे बेबी' सिनेमाच्या सेटवरील बीटीएसचा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला होता. छोट्या जुआनासोबत सीन शुट करण्यासाठी धूम्रपान करणे सोडावे लागले होते, असे त्यानं 'X'वर फोटो शेअर करत लिहिले होते. सिनेमाच्या रिलीजनंतर जुआनाच्या क्युटनेसवर प्रेक्षकांसह समीक्षक देखील फिदा झाले होते.  

(नक्की वाचा: मूर्खपणा बंद कर! म्हणत पहिल्या पत्नीने आमीर खानच्या लगावली होती कानशिलात, कारण...)

जुआनाला मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहण्याची चाहत्यांची इच्छा 

जुनाआ सांघवीचे वाढदिवसाच्या पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता जुआना 20 वर्षांची झाली आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर जुआनाला मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहण्याची इच्छा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. 

VIDEO: सुट्टीत कोकणात जायच्या प्लॅनवर मेगाब्लॉकची वक्रदृष्टी, 28 दिवस काम चालणार 

Topics mentioned in this article