सिटकॉम 'तारक मेहता का उल्टा चश्मा' गेल्या १८ वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करीत आहे. ही मालिका अनेक चाहत्यांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. अनेक घरांमध्ये तर सलग तारका मेहताचे एपिसोड पाहिले जातात. असित मोदी यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. त्यांनी या मालिकेचं एक खास सिक्रेट सांगितलं आहे.
असित मोदी मालिकेबद्दल काय म्हणाले?
असित मोदी म्हणाले, अनेक जणं सांगतात की ते ही मालिका पाहत मोठे झाले. त्यांनी कुटुंबासह ही मालिका पाहिली. अडचणीच्या काळात या मालिकेमुळे चेहऱ्यावर हास्य उमटलं. त्यामुळे मी यशापेक्षाही खूप जास्त मिळवलं आहे. मी चाहते, प्रेक्षक, मालिकेतील पात्र, क्रू आणि चॅनलचा आभारी आहे. त्यांनी माझ्यावरील विश्वास कायम ठेवला.
१८ वर्षांपर्यंत ही मालिका सुरू कशी राहिली?
ही मालिका गेल्या १८ वर्षांपासून सुरू आहे. याबाबत असित मोदी म्हणाले, ही मालिका गेल्या इतक्या वर्षांपासून सुरू असल्याचं मुख्य कारण म्हणजे मालिका आपलं ध्येय कधीच सोडलं नाही. पहिल्या दिवसापासून आम्ही अशा गोष्टी तयार करीत होतो, ज्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटेल. कुटुंब एकत्र येणं, लोकांना जोडणारे सामाजिक संदेश देणं ज्यामुळे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर स्माइल येईल. आम्ही काळानुसार विकसित झालो, मात्र सकारात्मकता, एकोपा आणि स्वच्छ कौटुंबिक मनोरंजन ही आमची मूळ मूल्ये आम्ही कधीही बदलली नाहीत. मला वाटतं की, याच प्रामाणिकपणामुळे प्रेक्षक १८ वर्षांपासून आमच्याशी जोडलेले आहेत.
ते पुढे म्हणाले, आमचा यशाचा मंत्र नेहमीच साधा राहिला आहे. कथा आणि पात्राशी प्रामाणिक राहा... आम्ही केव्हाच मालिकेचं मूळ बदललं नाही आणि प्रत्येक दिवसाचा एक प्रभावित करणारा क्षण शोधत होतो. आम्ही सोसायटींचं निरीक्षण करीत होतो...समजून घेतो. लोक जे अनुभवतायेत ते सकारात्मकपणे आणि ह्युमरसह सादर करतो. प्रेक्षक आमच्यासह भावनिक आणि रिलेशनशिपमुळे बांधले गेलेले आहेत. ते गोकुलधाम पाहून कनेक्शन फील करतात.
मालिकेत नुकताच स्पाइडर मॅन पाहायला मिळाला. मालिकेत हॉलिवूड चित्रपट स्पाइडर मॅन ब्रँड न्यू डेला प्रमोट करण्यात आलं. मालिकेत स्पाइडर मॅन चंपक काकांना नमस्कार करतानाही दिसला. त्यामुळे स्पाइडर मॅनला संस्कारी स्पाइडर मॅन म्हटलं गेलं. गोकुलधाम सोसायटीचं नुकतच नुतनीकरण करण्यात आलं. आता मालिकेत नवी सोसायटी पाहायला मिळत आहे.
मालिकेबद्दल सांगायचे झाल्यास, दिलीप जोशी जेठालालची भूमिका साकारतात. त्याचं मुख्य पात्र आहेत. दिशा वकानीने शोमध्ये दयाबेनची भूमिका साकारली होती, पण ती अनेक वर्षांपासून शोमध्ये दिसलेली नाही. या शोमध्ये मुनमुन दत्ता, श्याम पाठक, अमित भट्ट, तनुज महाशब्दे आणि सोनालिका जोशी हे कलाकारही आहेत. शैलेश लोढा देखील शोमध्ये दिसले होते, पण आता ते शोचा भाग नाहीत. त्यांनी शो सोडला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world