Pranit More Show: कॉमेडियन प्रणित मोरेचा शो कसा पाहायचा? तिकीट बुकिंगपासून किमतीपर्यंतची संपूर्ण माहिती

Pranit More Show: प्रणितने अद्याप त्याच्या शोबद्दल कुठलीही माहिती प्रसिद्ध केलेली नाही. मात्र प्रणित मोरे यांच्या शो पाहण्यासाठी तिकीट बुक करायचे असल्यास ही प्रक्रिया सोपी आहे. प्रणितच्या शोचे तिकीट ऑनलाईन बुक करता येतात. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Pranit More Show: बिग बॉस फेम प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरे याचा स्टँड-अप कॉमेडी शो पाहण्यासाठी सध्या मुंबईमध्ये तरुणाईमध्ये मोठी उत्सुकता आहे. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर आता प्रणित मोरे पु्न्हा एकदा स्टँड अप कॉमेडी शो करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रणितने अद्याप त्याच्या शोबद्दल कुठलीही माहिती प्रसिद्ध केलेली नाही. मात्र प्रणित मोरे यांच्या शो पाहण्यासाठी तिकीट बुक करायचे असल्यास ही प्रक्रिया सोपी आहे. प्रणितच्या शोचे तिकीट ऑनलाईन बुक करता येतात. 

शो पाहण्यासाठी काय करावे लागेल?

प्रणित मोरे यांचा शो पाहण्यासाठी तुम्हाला प्रामुख्याने ऑनलाइन तिकीट बुकिंग करावे लागेल.

बुकिंग वेबसाइट्स

BookMyShow आणि Paytm Insider या दोन प्रमुख प्लॅटफॉर्मवरून भारतातील कॉमेडी शोसाठी तिकीट बुकिंग केले जातात. तुम्ही त्यांच्या ॲप्स किंवा वेबसाइट्सवर Pranit More असे सर्च करून त्यांचे आगामी शो पाहू शकता. सध्यातरी त्याचा कोणताही आगामी शो दिसत नाही. Insider.in हा कॉमेडी शो बुकिंगसाठीचा आणखी एक महत्त्वाचा भागीदार आहे.

(नक्की वाचा-  Bigg Boss 19 Pranit More Earning: 'बिग बॉस' गाजवणाऱ्या प्रणित मोरेला शोमधून किती पैसे मिळाले ?)

सोशल मीडिया फॉलो करा

प्रणित मोरे आणि मुंबईतील कॉमेडीसाठी प्रसिद्ध असलेले साईट्स उदा. The Comedy Store, Canvas Laugh Club यांना इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर फॉलो करा. शोच्या घोषणा आणि थेट बुकिंग लिंक्स येथे उपलब्ध असतात. त्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी आणि ज्या स्थळी शो पाहायचा आहे, तो शो तिकीट बुकिंग वेबसाइट्सवर निश्चित करा.

तिकिटांच्या किमती 

बिग बॉसच्या घरात जाण्याआधी प्रणित मोरेच्या मुंबईतील शोसाठी तिकिटांच्या किमती साधारणपणे 500 ते 1500 रुपये किंवा त्याहून अधिक होत्या. ही किंमत निवडलेल्या स्थळावर, सीटवर आणि कार्यक्रमावर अवलंबून असते. 

Advertisement
Topics mentioned in this article