Karan Arjun Re-release: "मेरे करण अर्जुन आएंगे" हा डायलॉग कोणत्या चित्रपटातील आहे, हे चित्रपट फॅन्सना सांगण्याची गरज नाही. तुम्ही शाहरुख किंवा सलमान खानचे फॅन असाल हा फक्त तुमच्यासाठी सिनेमातील डायलॉग नाही तर इमोशन आहे. 29 वर्षांपूर्वी 1995 साली शाहरुख खान आणि सलमान खान हे दोन सुपरस्टार करण-अर्जुन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सलमानचा (करन), शाहरुख (्अर्जुन) यांच्यासह काजोल, ममता कुलकर्णी, राखी, अमरीश पूरी, रणजीत आणि अशोक सराफ ही तगडी स्टारकास्ट या सिनेमात होती. या सिनेमानं तेव्हा लोकप्रियतेचे उच्चांक गाठले होते. आजही त्याचं फॅन्सच्या मनात खास घर आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तब्बल 29 वर्षांनी ‘करण-अर्जुन' यांचा पुनर्जन्म होतोय. हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. या चित्रपटाबाबत फॅन्सप्रमाणेच कलाकारांमध्येही उत्सुकता आहे. अभिनेता ऋतिर रोशनचे वडील राकेश रोशन या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. त्यामुळे साहजिकच या चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया ऋतिकनं अगदी जवळून पाहिली आहे.
(नक्की वाचा: सरन्यायाधीशांना सापडेना हरवलेलं घर, नवे CJI संजीव खन्नांची हृदयस्पर्शी स्टोरी, एकदा वाचाच)
हृतिक रोशनने ट्विट करत, करण अर्जुन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक मनोरंजक किस्सा शेअर केला आहे. 'भाग अर्जुन भाग' या करण-अर्जुनमधल्या ऐतिहासिक डायलॉगचा हा किस्सा आहे. या डायलॉगप्रमाणेच ऋतिकची पोस्ट सुपरहिट झालीय.
(नक्की वाचा: IPL 2025 Mega Auction : 17 वर्षांचा मुंबईकर होणार CSK मध्ये ऋतुराजचा जोडीदार? धोनीही झाला प्रभावित)
हृतिक रोशनने एक्स (ट्विटर) वर करण-अर्जून च्या रिरिलीज बद्द्ल एक पोस्ट लिहली आहे. ज्यात त्याने लिहलयं, 1992ची ती दुपार जेव्हा आम्ही वडीलांसोबत (राकेश रोशन) लिव्हिंग रुममध्ये बसलो होतो, लेखकांसोबत करण-अर्जून चित्रपटाबद्दल चर्चा सुरु होती. रुममध्ये 10-15 मिनिट शांतता होती. आणि अचानक वडिलांना एक कल्पना सुचली, त्यांनी आम्हाला सांगितले की, त्यांना इंटरवलच्या फाइटबद्द्ल एक जबरदस्त कल्पना सुचली आहे. आणि ते जोरात ओरडले भाग अर्जुन !!!! भाग अर्जुन!!!!
मी तेव्हा 17 वर्षांचा होतो. मला एक प्रेक्षक म्हणून तो डायलॉग ऐकल्यानंतर माझ्या अंगावर काटा उभा राहिला. तेव्हापासून माझा या चित्रपटामधील रस वाढला. हा सिनेमा ब्लॉकब्लास्ट ठरले, असं मला त्याचवेळी वाटलं. आता 22 नोव्हेंबर 2024 पासून जगभरातील थिएटरमध्ये करण अर्जुनचा पुनर्जन्म पाहण्यासाठी मी आतुर झालो आहे.