IPL 2025 Mega Auction : आयपीएल 2025 साठी होणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी सर्वच टीम सध्या तयारी करत आहेत. यंदा मेगा ऑक्शन होणार असल्यानं सर्वच टीममध्ये मोठे बदल होणार आहेत. त्याचबरोबर खेळाडू खरेदी करताना पुढील तीन वर्षांचा विचारही सर्व टीम्सना करावा लागणार आहे. पाच वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज आगामी ऑक्शममध्ये 17 वर्षांचा मुंबईकर खरेदी करण्याच्या तयारीत आहे.
सीएसकेनं त्यांच्या ट्रायलसाठी मुंबईचा 17 वर्षांचा बॅटर आयुष म्हात्रेला (Ayush Mhatre) बोलवलं असल्याची माहिती समोर आली आहे. टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी त्याच्या कामगिरीनं प्रभावित झाल्याची माहिती आहे. रणजी स्पर्धेचा पाचवा राऊंड 16 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे सीएसकेकडं त्याची चाचणी घेण्यास 8 दिवसांचा कालावधी आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'टाईम्स ऑफ इंडिया' नं दिलेल्या वृत्तानुसार आयुष म्हात्रेनं त्याच्या कामगिरीच्या जोरावर सीएसकेची टॅलेंट टीम तसंच महेंद्रसिंह धोनीला प्रभावित केलंय. त्यामुळे त्याला सीएसकेनं ट्रायलसाठी बोलावलं आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेचा पाचवा राऊंड संपल्यानंतर सहा दिवसांनी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सुरु होणार आहे. या दरम्यानच्या काळात ही चाचणी होईल.
कोण आहे आयुष म्हात्रे?
मुंबई विरुद्ध शेष भारत या इराणी ट्रॉफी स्पर्धेच्या मॅचमध्ये आयुष म्हात्रेनं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्या मॅचमध्ये त्यानं पृथ्वी शॉ सह मुंबईच्या इनिंगची सुरुवात करत दोन इनिंगमध्ये अनुक्रमे 19 आणि 14 रन काढले.
( नक्की वाचा : Champions Trophy 2025 : ICC चा प्लॅन तयार, पाकिस्ताननं हेका सोडला नाही तर 'या' देशात होणार स्पर्धा! )
सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये म्हात्रेनं 35.66 च्या सरासरानं 321 रन काढले आहेत. त्यामध्ये एक सेंच्युरी आणि एक हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. महाराष्ट्राविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये त्यानं 176 रनची खेळी करत सर्वांना प्रभावित केलं होतं.
CSKHPC नवलपूर मैदानात होणाऱ्या चाचणीसाठी उपस्थित राहण्यात म्हात्रेला परवानगी द्यावी, अशी विनंती चेन्नई सुपर किंग्जचे व्यवस्थापकीय संचालक काशी विश्वनाथन यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) केली आहे, अशी माहिती या वृत्तामध्ये देण्यात आलीय.
( नक्की वाचा : 'तांबडी चामडी चमकते..' 25 व्या वाढदिवसानिमित्त पृथ्वी शॉचा Crazy Dance Viral )
आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनसाठी चेन्नई सुपर किंग्जकडं सध्या 55 कोटी आहेत. त्यांनी या ऑक्शपूर्वी ऋतुराज गायकवाड, रविंद्र जडेजा, मथीशा पथीराणा, शिवम दुबे आणि महेंद्रसिंह धोनी यांना रिटेन केलं आहे. त्यांनी आयुष म्हात्रेला खरेदी केलं तर तो सीएसकेचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडसोबत सीएसकेच्या इनिंगची सुरुवात करु शकतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world