देशाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पदाचा कार्यकाळ नुकताच संपुष्टात आला. 11 नोव्हेंबरला, संजीव खन्ना यांनी भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी 9 नोव्हेंबर 2022 रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली होती. 10 नोव्हेंबर 2024 हा त्यांच्या सरन्यायाधीशपदाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे धनंजय चंद्रचूड बरोबर दोन वर्षांसाठी सरन्यायाधीशपदी होते. पण संजीव खन्ना यांना सरन्यायाधीशपदी फक्त सहा महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संजीव खन्ना यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापर्यंतच्या प्रवासातील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या सर्वसामान्यांना माहित आहेत. पण, त्यांच्या आयुष्यातील एक खास गोष्ट अशी आहे जी क्वचितच कुणाला माहीत असेल. ही गोष्ट आहे सरन्यायाधीश संजय खन्ना यांच्या हरवलेल्या घराची. संजीव खन्ना लहान असताना यांच्या आजोबांनी पंजाबच्या अमृतसरमध्ये एक घर खरेदी केले होते. आता अनेक वर्षानंतर CJI खन्ना जेव्हा घर शोधण्याचा प्रयत्न करतात मात्र ते सापडत नाही. नेमका काय आहे या घराचा खास किस्सा? वाचा सविस्तर.
(नक्की वाचा: उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टर उड्डाणाला परवानगी नाकारली; काय आहे कारण?)
जे घर त्यांच्या 'बाउजी' म्हणजेच आजोबांनी विकत घेतलं होतं. CJI जवळच्या सूत्रांनी सांगितले की, CJI खन्ना जेव्हाही अमृतसरला जायचे तेव्हा ते नेहमी त्यांच्या आजोबांनी घेतलेल्या 'कटरा शेर सिंह' येथील घराला हमखास भेट द्यायचे. परंतु अनेक वर्ष उलटून गेल्यानंतर पून्हा त्यांनी अमृतसरातील घराला भेट दिल्यावर तेथील अनेक गोष्टी बदललेल्या जाणवल्या. त्यांच घर, आजूबाजूचा परिसर पूर्णपणे बदलला होता.
(नक्की वाचा: 'भुजबळांना सर्व काही दिलं, त्यांनी मात्र धोका दिला' येवल्यात येवून पवारांनी पुढचा प्लॅन सांगितला)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, CJI खन्ना यांचे आजोबा सरव दयाल हे एकेकाळी प्रसिद्ध वकील होते, ते 1919 मध्ये जालियनवाला बाग घटनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या काँग्रेस समितीमधील सदस्य होते. त्यावेळी त्यांनी अमृतसरमधील कटरा शेर सिंग येथे दोन घरे विकत घेतली होती आणि हिमाचलमधील डलहौसी येथेही. 1947 साली, कटरा शेर सिंह येथील त्यांच्या घराची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. त्याचबरोबर, त्यांच्या आजोबांनी ते घर पुन्हा दुरुस्त केले, जेव्हा संजीव खन्ना पाच वर्षांचे होते, तेव्हा त्यांचे वडील देवराज खन्ना यांच्यासोबत ते त्या घरात गेले होते. त्याठिकाणी एक चिन्ह सापडले, ज्यावर 'बाउजी' असे लिहिले होते. हे स्मृतीचिन्ह आजही त्यांच्या डलहौसी घरात ठेवण्यात आले आहे.
संजीव खन्ना यांचे आजोबा सरव दयाल यांच्या निधनानंतर 1970 मध्ये अमृतसरमधील घर विकले गेले. CJI खन्ना आजही त्यांच्या घराच्या आठवणींमध्ये रमतात. म्हणूनच जेव्हाही ते अमृतसरला जातात, तेव्हा जालियनवाला बागजवळील कटरा शेर सिंग याठिकाणी आवर्जून भेट देतात आणि त्यांचे आठवणातील घर शोधण्याचा प्रयत्न करतात. पण ते घर त्यांना ओळखता येत नाही. कारण, आता या परिसरात इतका बदल झाला आहे की घर नेमकं कुठे होतं हेच ओळखणं अशक्य आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world