जाहिरात

Usha Nadkarni : 'काम करताना मरण यावं, मज्जा येईल'; रोखठोख मतं मांडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीची दुखरी बाजू 

मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्रीची दुखरी बाजू समोर आली आहे. ही अभिनेत्री ऐरवी नकारार्थी भूमिका साकारले, खाष्ट सासूचं पात्र वठवणारी अभिनेत्री उषा नाडकर्णी एका मुलाखतीदरम्यान भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

Usha Nadkarni : 'काम करताना मरण यावं, मज्जा येईल'; रोखठोख मतं मांडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीची दुखरी बाजू 

Usha Nadkarni emotional video : सिनेअभिनेते चाहत्यांचा आयुष्यात मोठा भाग झालेले असतात. चित्रपट, मालिका आणि नाटक याच्या माध्यमातून कलाकार चाहत्यांच्या घराघरात आणि जीवनाचा भाग होतात. अशा आवडत्या कलाकारांची एग्झिट जितकी त्या व्यक्तीच्या कुटुंबाला धक्का देणारी असते तशीच ती चाहत्यांनाही भावुक करणारी असते. काही दिवसांपूर्वी सुपरस्टार धर्मेंद्र यांचं निधन झालं. ज्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली होती. 

आपल्यासाठी कोणी त्रास घ्यायला नको....

दरम्यान मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्रीची दुखरी बाजू समोर आली आहे. ही अभिनेत्री ऐरवी नकारार्थी भूमिका साकारले, खाष्ट सासूचं पात्र वठवणारी अभिनेत्री उषा नाडकर्णी एका मुलाखतीदरम्यान भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. त्या म्हणाल्या, काम करताना मरण आलं तर मज्जा येईल मला. आपल्यासाठी कोणी त्रास घ्यायला नको. आपल्याला बघून कोणाला वाईट वाटायला नको आणि लोक आपल्यासाठी करतात हे पाहून मला वाईट वाटायला नको. त्या पुढे म्हणाल्या, मी आजारी पडले तर माझ्या मुलाला त्रास होणार, मग तो त्याच्या बायको-मुलीला बघणार की मला बघणार. माझ्या बाजूला एक बंगाली राहतात त्यांनी सांगितलंय काकी कधीही काही झालं. संकोचू नका कधीही रात्री-अपरात्री फोन करा.

नक्की वाचा - याड लागलं रं..! अंधेरीत स्टार अभिनेत्रीनं मध्यरात्री नको ते केलं, पोलिसांची उडाली झोप, Video व्हायरल 

वयाच्या ८० व्या वर्षीही एकट्याच राहतात...

मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. मराठीसह त्यांनी हिंदीतही बरंच काम केलंय. पवित्र रिश्ता या मालिकेत त्यांची महत्त्वाची भूमिका साकारली होती. स्पष्टवक्तापणासाठी त्या ओळखल्या जातात. जे आपल्याला पटत नाही ते परखडपणे मांडत असतात. वयाच्या ८० व्या वर्षीही त्या एकटीनं घर सांभाळत असल्याचं सांगितलं जातं. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com