Ikkis Box Office Collection: स्टार किड अगस्त्य नंदानं त्याचा पहिला सिनेमा 'इक्कीस'च्या माध्यमातून बॉक्सऑफिसवर अपेक्षेपेक्षा चांगली सुरुवात केलीय. प्रेक्षकांमध्ये सिनेमाची चर्चा ऐकायला मिळतेय. विशेष म्हणजे चाहते अगस्त्यची तुलना त्याचा मामा अभिषेक बच्चनशी करत आहेत. अभिषेक बच्चननंही आपल्या करिअरची सुरुवात वॉर ड्रामा 'रिफ्युजी' सिनेमापासून केली होती. आता आकडेवारीबाबत सांगायचे झालं तर अगस्त्य नंदानं आपल्या पहिल्याच चित्रपटातून अभिषेक बच्चनचा डेब्यू रेकॉर्डला मागे टाकण्याच्या दिशेने वाटचाल केलीय.
इक्कीस सिनेमाचा दुसऱ्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन | Ikkis Box Office Collection
बॉक्सऑफिसच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 'इक्कीस' सिनेमाने दुसऱ्या दिवशी 4.02 कोटी रुपयांची कमाई केलीय. शुक्रवारी चित्रपटाच्या कमाईत सुमारे 25 टक्के घट नोंदवली गेली तरीही चित्रपटाची पकड मजबूत मानली जातेय. रणवीर सिंगचा ‘धुरंधर' आणि हॉलीवूड सिनेमा ‘अवतार: फायर अँड अॅश' अशा मोठ्या चित्रपटांच्या स्पर्धेतही 'इक्कीस'ची सिनेमागृहांमध्ये जादू पाहायला मिळतेय.
इक्कीस सिनेमाचं 60 कोटी रुपयांचं बजेट
दोन दिवसांत चित्रपटाची भारतातील एकूण कमाई 11.30 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलीय. जीएसटी जोडल्यावर चित्रपटाचे ग्रॉस कलेक्शन 13.33 कोटी रुपये झालंय. रिपोर्ट्सनुसार 'इक्कीस' सिनेमाचं बजेट सुमारे 60 कोटी रुपये इतकं आहे आणि अवघ्या दोन दिवसांत मेकर्सनी सुमारे 18.83% बजेट रिकव्हर केलंय. ट्रेड एक्स्पर्ट्सच्या मते, वीकेंडला सिनेमाच्या कमाईत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा: Dharmendra News: धर्मेंद्र-हेमा मालिनींच्या नातवाचा फोटो पाहिला का? चेहरा पाहून चाहत्यांना हीमॅनची आली आठवण)
अरुण खेतरपाल यांच्या जीवनावर आधारित सिनेमासिनेमासाठी दिलासादायक बाब म्हणजे 23 जानेवारी 2025 पर्यंत कोणताही मोठा हिंदी सिनेमा रिलीज होणार नाही, कारण त्या दिवशी ‘बॉर्डर 2' सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. त्यामुळे 'इक्कीस' सिनेमाला बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्याची आणि सेफ झोनमध्ये पोहोचण्याची चांगली संधी आहे. हा सिनेमा कारगिल युद्धातील नायक अरुण खेतरपाल यांच्या जीवनावर आधारित एक बायोग्राफिकल वॉर ड्रामा आहे, ज्यामध्ये दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.

Photo Credit: IANS English
रिफ्युजी सिनेमाने किती कमाई केली होती?अभिषेक बच्चनचा डेब्यू सिनेमा ‘रिफ्युजी'बाबत सांगायचं झालं तर सिनेमाने 17.08 कोटी रुपयांची नेट कमाई केली होती. 'इक्कीस'ने अवघ्या 48 तासांतच त्या कमाईपैकी 66 टक्के हिस्सा मिळवलाय. पहिल्याच वीकेंडमध्ये अगस्त्य नंदा आपल्या मामाच्या पहिल्या सिनेमाचा विक्रम मोडेल, असा अंदाज आहे. येत्या काळात 'इक्कीस' बॉक्सऑफिसवर हिट ठरतो की नाही, हे पाहणंही उत्सुकतेचे ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
